आर्थिकदृष्ट्या खचलेल्या मावळ्यांच्या वंशजांसाठी दानशूरांनी पुढे यावे. – नामदेव शिंदे

बारामती(वार्ताहर): छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांचे योगदान खुप मोठे होते. मात्र, त्या मावळ्यांचे वंशज आर्थिकदृष्ट्या खचलेले आहेत त्यांच्या सन्मानापेक्षा दानशूर व्यक्ती, संस्था व मंडळांनी सढळ हाताने मदत करण्याची गरज असल्याचे बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शिवजयंती मोठ्या स्वरूपात साजरी न करता शहरातील मंडळाचे प्रतिनिधींना बारामती शहर पोलीस स्टेशनने एकत्र करून नरवीर तानाजी मालुसरे यांचे वशंज यांचा सन्मान व केलेली आर्थिक मदत देवून एक आगळीवेगळी शिवजयंती साजरी केली.

‘गड आला पण सिंह गेला’ नरवीर तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी दिलेली कवड्याची माळ घेऊन त्यांचे 12 वे वंशज शितल मालुसरे, कन्या देवयानी मालुसरे यांना खास शहर पोलीस स्टेशनला शिवजयंती निमित्त आमंत्रित करण्यात आले होते.

19 फेब्रुवारी रोजी शहर पोलीस स्टेशनमध्ये शिवप्रतिमा पूजन करून रविवारी मालुसरे यांच्या वंशज याचा सन्मान व छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांचे मैत्री,स्वराज निष्ठ व कवड्याची माळेचे महत्व नामदेव शिंदे यांनी यावेळी सांगितले. मालुसरे यांचे वशंज सद्या आर्थिक अडचणी मध्ये आहेत त्यांना राहण्यास हक्काचे घर नाही अनेक ठिकाणी जमिनी,वतन या बाबत शासनाकडे पाठपुरावा चालू आहे तर काही ठिकाणी कोर्ट कचेर्‍या मध्ये प्रकरण प्रलंबित आहेत.

यापुढे महापुरुषांच्या जयंती, मिरवणूक,आतिषबाजी वर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा महापुरुषांचे वशंज आर्थिकदृष्ट्या मदत करून जयंत्या साजर्‍या झाल्या पाहिजेत. हा उपक्रम युवकांनी, मंडळांनी पुढे चालू ठेवावा यासाठी शहर पोलीस स्टेशनने पुढाकार घेऊन सुरुवात केली असल्याची माहिती श्री.शिंदे यांनी दिली.

शीतल मालुसरे भावनिक होऊन म्हणाल्या की, मालुसरे यांचे वंशज यांचा सन्मान पोलीस स्टेशनमध्ये शिवजयंती निमित्त करणे हे आमचे भाग्य समजतो व सामाजिक बांधीलकी जपत शिवजयंती साजरी होत असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!