या भारत देशातील विविध घटक व त्या घटकातील व्यक्ती स्वत:च्या न्यायासाठी आंदोलन, उपोषण, धरणे आंदोलन, रेल रोको, रास्ता रोको, ठिया आंदोलन इ. स्वरूपाचे आंदोलन करून स्वत:वर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मागण्याचा प्रयत्न करीत असतो.
दिल्लीमध्ये 26 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या शेतकर्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसेवरुन आणि लाल किल्ल्यामध्ये झालेल्या गोंधळावरुन सर्वच स्तरामधून टीका होताना दिसत आहे. लाल किल्लयावरील तिरंगाच्या खाली असणार्या अन्य एका ध्वजस्तंभावर काही तरुणांनी पिवळ्या रंगाचा त्रिकोणी झेंडा फडकवल्याचेही दिसत आहे.
भारत सरकार गृहमंत्रालयाने भारतीय झंडा संहिता केलेली आहे. सदर झंडा संहिता पाहिली असता, इतर कोणत्या झेंड्याची पताका किंवा राष्ट्रीय झेंड्याच्या वर किंवा बराबर कोणी इतर झेंडा किंवा पुष्पगुच्छ, हार याचे प्रतीकांसहीत इतर कोणतीही वस्तु ध्वज-दंडाच्या वर ठेवल्यास राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यासारखा आहे. यानुसार संबंधितावर राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवला जातो. दीड महिना झाला हे आंदोलक आंदोलन करीत आहेत. मात्र, या आंदोलकांची पातळी घसरू लागली आहे. बरं झाले या शेतकर्यांनी हिरवा झेंडा लावला नाही. अन्यथा या आंदोलकांमध्ये पाकिस्तानी सुद्धा आले होते असा समज झाला असता.
आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रूधुरांचा वापर करावा लागला शेतकर्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यांना न्याय दिला गेला पाहिजे. एवढी टोकाची भूमिका केंद्र सरकारने घेऊ नये. अशी कडवी प्रतिक्रिया सर्वस्तरातून नागरीकांमधून उमटू लागलेली आहे. आंदोलकांचा धीर सुटू लागलेला दिसत आहे. 26 जानेवारी रोजी राष्ट्रीय झेंड्याखाली किंवा समान जर झेंडे लागले जावू लागले तर ही धोक्याची घंटा आहे. ध्वज संहितेचा अपमान आहे. न्याय मिळविण्याच्या कार्यात राष्ट्रीय ध्वजाचा अपमान होत आहे हे सर्व विसरून गेले आहेत. सगळ्यांना वाटते शेतकर्यांना न्याय मिळावा, त्यांनी रात्रं-दिवस राबवून पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळावा मात्र, राष्ट्राला धोका निर्माण होईल असे वक्तव्य किंवा कृती केल्यास आंदोलकांचा तोल सुटत असल्याचे दिसत आहे.
आंदोलकांनी 27 जानेवारी रोजी ध्वज फडकविला असता तर वेगळी गोष्ट आहे. मात्र, 26 जानेवारी रोजी लालकिल्ल्यात येऊन राष्ट्रीय ध्वजाच्या खाली किंवा समांतर इतर ध्वज फडकवून काय साध्य करणार हेच कळाले नाही.
शेतकरी आंदोलनाला शीख फॉर जस्टीस या संघटनेचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. या संघटनेवर भारतात बंदी आहे. ट्रॅक्टर रॅली काढण्याची मागणी या संघटनेने केंद्राकडे केली होती. त्यांनी असेही म्हटले होते त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसा झाली, तर त्याला सरकारच जबाबदार असेल असेही म्हटले होते.
शीख फॉर जस्टीस अमेरिकेत उदयाला आली. 2007 मध्ये संघटनेची स्थापना झाली. पंजाबमध्ये खलिस्तान निर्माण करण्याचा या संघटनेचा हेतू आहे. पंजाबमध्ये विद्यापीठातून वकिलीची पदवी घेतलेले आणि अमेरिकेत वकिली करत असलेले गुरपतवंत सिंह पन्नू हे शीख फॉर जस्टीसचा प्रमुख चेहरा आहेत. पन्नू नेहमी चर्चेतमध्ये असतात. गुरपतवंत सिंह यांनीच प्रजासत्ताक दिनी हिंसाचाराचा इशारा दिला होता. मागील वर्षीही शीख फॉर जस्टीसने एक कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केला होता. या कार्यक्रमात जगभरातील शीख बांधवांना सहभागी होण्याचे आणि खलिस्तानच्या प्रचार मोहिमेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले असल्याचे कळते. हे सर्व आंदोलन सुरू असताना राष्ट्रीय ध्वजाचा अवमान, अपमान भारतीय सहन करणार नाही हेही तेवढेच सत्य आहे.