बारामती(वार्ताहर): इंजिनइरींगचे शिक्षण घेत असता व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने तीन मित्रांनी एकत्र येऊन शिवाजी चौक, गुनवडी रोड येथे इंजिनइरींग चाय दुकान सुरू केले. या दुकानाचे उद्घाटन बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत ओंकार अनिल खलाटे, मयुर विजय गवारे, तानाजी महादेव कोळेकर यांनी केले. या तिघांनी एकत्र येऊन बारामतीच्या चोखंदळ ग्राहकांसाठी एक वेगळा चहाचा स्वाद देण्याचा प्रयत्न केला आहे. एकदा प्याल तर पुन्हा..पुन्हा.. याल असेही आवाहन नागरीकांना केले आहे.