7 गडी बाद करीत 22 धावा राखुन, जेजुरी संघ उपमुख्यमंत्री चषकाचा मानकरी ठरला!

एस.पी.सोशल फाऊंडेशनतर्फे नियोजनबद्ध टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा दिमाखात संपन्न

बारामती(वार्ताहर): वॉरइर्स बारामती व जेजुरी संघात झालेल्या अंतिम सामन्यात जेजुरी संघाने उत्कृष्ठ फलंदाजी करीत वॉरइर्सला 90 धावांचे आवाहन ठेवले होते. मात्र, वॉरइर्स संघ फलंदाजी करीत असताना जेजुरी संघाने केलेल्या गोलंदाजी समोर टिकू शकला नाही. 7 गडी बाद होऊन 22 धावा राखुन जेजुरी संघ शेवटी उपमुख्यमंत्री चषकाचा मानकरी ठरला.

बारामती येथील विधायक स्वरूपात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्‍या एस.पी.सोशल फाऊंडेशन बारामतीतर्फे माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवासाचे औचित्य साधुन उपमुख्यमंत्री चषक 2021 नावाने भव्य-दिव्य (टेनिस बॉल) क्रिकेट स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर मोठ्या दिमाखात संपन्न झाल्या.

दि.20 जानेवारी 2021 रोजी या स्पर्धेचे उदघाटन बारामती नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ. पौर्णिमा तावरे, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती महिला शहराध्यक्षा सौ.अनिता गायकवाड, नगरसेवक राजेंद्र बनकर, सौ.सविता जाधव, सौ.शितल गायकवाड, सौ.रुपाली गायकवाड, सौ.अनिता जगताप, सौ.कमल कोकरे, नगरसेवक नवनाथ बल्लाळ, सुधीर पानसरे, अभिजित चव्हाण, प्रविण माने, संतोष सातव, नितीन शेलार, बबलू जगताप, उत्तम धोत्रे इ. मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

या स्पर्धेमध्ये मुंबई, सातारा,बदलापूर,माळशिरस, दौंड, पुणे, कराड, हवेली, माढा, जयसिंगपूर, फलटण येथील 32 संघ सहभागी झाले होते. वॉरइर्स बारामती, शिरसट पुणे, जेजुरी व माण एलेव्हन या चार संघानी उपांत्यफेरीत प्रवेश केला होता. शेवटी वॉरइर्स बारामती आणि जेजुरी या दोन संघामध्ये अंतिम सामना रंगला होता. चुरशीच्या लढतीत अखेर जेजुरीचा संघ विजेता ठरला.
जेजुरी संघातील विकी नवले हा अंतीम सामन्यातील सामनावीर ठरला. बारामती वॉरइर्स संघातील ऋषी शिंदे हा उत्कृष्ठ गोलंदाजी व जेजुरी संघातील संदेश हा मालिकावीर ठरला व त्याने एलसीडी टीव्ही बक्षिस पटकाविले. देशभरात प्रसिध्द असलेला खेळाडू कृष्णा सातपुते या स्पर्धेत प्रमुख आकर्षक म्हणून ठरला. प्रेक्षकांना कृष्णाची फलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

या स्पर्धेचे अनुक्रमे प्रथम 80, 40, 20 व 10 हजार व चषक असे पारितोषिक ठेवण्यात आले होते.
एस.पी.सोशल फाऊंडेशन ज्याप्रमाणे क्रीडा क्षेत्रात गेल्या 6 वर्षापासुन नावलौकीक मिळवत आहे. तसेच रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महापुरूषांच्या जयंती महोत्सव इ. कार्यक्रमाच्या माध्यमातून विधायक उपक्रम राबविण्यास अग्रेसर आहे.

एस.पी ग्रुपचे अध्यक्ष सुरज विजय शिंदे, नगरसेविका मयुरी सुरज शिंदे यांनी सर्व बक्षीस दात्यांचे, मान्यवरांचे, खेळाडूंचे तसेच आपल्या सर्व सहकार्यांचे मनापासून आभार मानले.

स्पर्धेचे उत्कृष्ठ आयोजक….
अमरभैय्या भंडारे, सुमितआप्पा सोनवणे, बापू भालेराव यांच्यासह शक्ती भंडारे, श्रीकांत पाथरकर, अमोल भोसले, उमेशभाऊ शिंदे, सागर मोतीकर, विकी लांडगे, रणजित पवार, आलिम मुशरीफ, मानव उगाडे, पप्पू साबळे, सचिन हजारे,सनी थोरात, गोपी टिळेकर, बबलू साळुंखे, इरफान तांबोळी, प्रेम खरात, आकाश ठाकुर,प्रशांत खुडे, धिरज जगताप, संतोष काकडे, नामदेव निकाळजे, बंटी डिकळे, गणेश भिसे,मयूर मोरे, शंकर शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी….
खडकीचे नगरसेवक दुर्योधन भापकर, बा.न.प.नगरसेवक सत्यव्रत काळे, बबलू देशमुख, बिरजू मांढरे, उद्योजक संतोष सातव, अक्षय मोकाशी, धनुमामा सावंत, नितीन शेलार, प्रविण झांबरे, डी.जी शिंदे, पंकज देवकाते, अशोक जगताप, श्रीरंग जमदाडे, दादासाहेब दांगडे, यशवंत खेडकर, अभिजित काळे, पिंटू गायकवाड, बाबा मोहिते, उत्तम धोत्रे, राहूल बोंडवे, गणेश पवार, उमेश शिंदे, भानुदास बागाव, अनिल जाधव, गौतम शिंदे या मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!