बारामती(वार्ताहर): मशिदीत जमा झालेल्या पैश्यातून 500 रूपये एक ट्रस्टी चोरताना सीसीटीव्ही पेक्षा करडी नजर असणार्या मुस्लीम समाजातील एका ज्येष्ठ नागरीकाने रंगेहाथ पकडले त्यामुळे सर्वत्र एकच चर्चेचा विषय बनला.
दर शुक्रवारी होणार्या महत्वाच्या नमाजीनंतर नमाज पठण करण्यास येणारे मशिदीच्या किरकोळ खर्चासाठी ठेवण्यात आलेल्या डब्यात स्वखुषीने पैसे टाकतात. नमाज पठण झालेनंतर काही मंडळी समाजसेवेच्या भावनेतून जमा झालेले पैसे मोजून ते मशिदीच्या ट्रस्टींकडे सुपूर्द करतात. मात्र याच भावनेतून एक ट्रस्टी (म्हणतात ना तुझी स्मशनात लाकडं गेली) पैसे मोजत होता. मोजता-मोजता या ट्रस्टीने 500 रूपयांची नोट खिशात घालताना एका मुस्लीम समाजातील ज्येष्ठ नागरीकाने रंगेहाथ पकडले. या ट्रस्टीची पळताभूई झाली, अंग थरथर कापू लागले, घामाने कुडता भिजला कारण चोरी उघडकीस आली ना? सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. सदरचा गोंधळ मिडीयाच्या कानावर पडू नये म्हणून एका महाभाग, डोक्यावर पडलेल्या भ्रष्टाचारी ट्रस्टीने या ज्येष्ठाची समजूत काढली. एक-एक प्रकार सुरू आहे तुम्ही कुठेही वाच्यता करू नका शांत रहा असे म्हणून वेळ मारून नेली.
इस्लामध्ये मशिदीतून चटईची निघालेली काडी घरी घेऊन जाणे म्हणजे गुन्हा असताना हे ट्रस्टी चक्क 500 रूपयाची नोट खिशात घालून निघाले होते. या बातमीने मशिदीच्या नावाखाली चोर्या-मार्या करणारांची मने दुखावली जाणार, संपादकावर काही अंधभक्तगण खापर फोडणार कारण कुंपनच शेत खातयं हे दाखविण्याचे काम सा.वतन की लकीरने केले आहे व पुढेही करीत राहणार यात शंका नाही.