मदरस्यातील दोन ट्रस्टी मशिदीत सुद्धा: मुस्लीम समाजाने जागृत होण्याची गरज
बारामतीः शगनशहा दर्गा मस्जिद ट्रस्टचा बनावट चेंज रिपोर्ट मंजुर केलेबाबतच्या रिट पिटीशनमध्ये उच्च न्यायालयाची वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नोटीस काढल्याने मुस्लीम समाजात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मदरस्यात उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश कुठे होत नाही तोपर्यंत मशिदीचे प्रकरण बाहेर आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामती येथील शगनशहा दर्गा मस्जिद ट्रस्ट ही अनेक वर्षापासून बारामती येथे कार्यरत आहे. सदरील ट्रस्टमध्ये एकमेव महंमद हनिफ महेबुब मनेर हे चिफ ट्रस्टी म्हणुन अनेक वर्षापासून होते. सदरील ट्रस्ट पूर्वी धर्मादाय आयुक्त पुणे यांचे येथे रजिस्ट्रर असुन त्याचा रजि. नंबर बी/60 असा आहे व त्यानंतर सदरील ट्रस्ट औरंगाबाद वक्फ बोर्ड येथे गेल्यानंतर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर MSBW/REG/08/34 असा आहे. सदरील महंमद हनिफ मनेर यांना नवीन चेंज रिपोर्ट दाखल करण्याचा पूर्ण हक्क व अधिकार होता. परंतु बारामती येथील काही विघ्नसंतोषी लोकांनी म्हणजेच 1) सलिम फकीर मोहम्मद बागवान, 2) अमजद अजिज बागवान, 3) शाकीर अब्दुल करीम बागवान, 4) फैय्याज मोहम्मद शरीफ बागवान, 5) फिरोज अजिज बागवान, 6) मुबारक हसन तांबोळी, 7) मोहम्मद हमीद शेख, 8) हमीद रशिदभाई तांबोळी यांनी महंमद हनिफ महेबुब मनेर यांचे सन 2012 रोजीच्या चेंज रिपोर्टवर खोट्या व बनावट सह्या मारून त्यांची ट्रस्ट मंजुर करून घेतली. सदरील बाब ही महंमद हनिफ मनेर यांना जेव्हा कळाली त्यावेळी महमंद मनेर यांनी औरंगाबाद वक्फ बोर्ड येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे येथे दि. 23/3/2015 रोजी वरील लोकांविरूध्द अर्ज दिला व त्यामध्ये असे म्हटले आहे की, वरील लोकांनी महमंद हनिफ मनेर यांच्या खोट्या सह्या केलेल्या आहेत, सदरील सह्या या माझ्या नसुन त्या मला मान्य व कबुल नाहीत आणि सलिम बागवान व इतर यांचा चेंज रिपोर्ट रद्द व्हावा. तसेच महमंद हनिफ मनेर यांनी सलिम फकीर बागवान व इतर यांचा चेज रिपोर्ट निकाली (Withdraw) करनेकामी देखील दि. 27/7/2015 रोजी अर्ज दिलेला होता. परंतु सदरील वक्फ बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोा यांनी त्या दोन्ही अर्जावर आजतागायत काहीएक कारवाई केली नाही. त्याकामी कैश शमशुद्दीन शेख व इतर हे मुंबई येथील मा.ना. उच्च न्यायालय सोा यांचे येथे रिटी पिटीशन दाखल केलेले आहे त्याबाबत सदरील रिट पिटीशन मा.ना. उच्च न्यायालय सोा खंडपीठ यांचेसमोर सुनावणी होवून त्यांनी दि. 15/1/2021 रोजी औरंगाबाद येथील मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सोा यांना नोटीस काढून त्यांनी दि.28/1/2021 पर्यंत ऍफीडेव्हीट फाईल करण्याचे आदेश पारीत केलेले आहेत. सदरील पिटीशनचे काम कैश शेख यांचेतर्फे ऍड. सुशांत प्रभुणे हे पाहत आहेत.