माळेगाव अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची टेक महिंद्रा आयटी कंपनीमध्ये निवड

माळेगाव(वार्ताहर): शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयातील 04 विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या टेक महिंद्रा या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. मुकणे यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या निवडीची प्रक्रिया ऍप्टिट्यूड टेस्ट, टेक्निकल इंटरव्ह्यू व पर्सनल इंटरव्ह्यू या तीन स्तरांवर मूल्यांकन करून संपन्न झाली. या निवड प्रक्रियेत अस्मिता शिंदे, रेश्मा बनकर, योगिनी देशमुख व दिव्या भुंजे या चार विद्यार्थिनी यशस्वी झाल्या. या विद्यार्थिनींना 3.6 लाखांपर्यंत वेतन कंपनीतर्फे  देण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रात यशस्वी असणारे उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाचा लौकिक आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच  रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर आधारित कार्यशाळांचे तसेच विविध वेबिनार मालिकांचे महाविद्यालयामार्फत आयोजन करण्यात येत आहे.

चालू शैक्षणिक वर्षांमध्ये आतापर्यंत 269 विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे व ही निवडीची प्रक्रिया अजूनही सुरूच असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ.माधव राउळ यांनी दिली.

निवड झालेल्या विद्यार्थिनींचे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व माळेगाव सहकारी  साखर कारखान्यांचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी कोकरे, संचालक मंडळ, विश्वस्त वसंतराव तावरे, अनिल जगताप, महेंद्र तावरे, रामदास आटोळे, गणपत देवकाते, रवींद्र थोरात, सौ.सीमा जाधव, सौ.चैत्राली गावडे  व संस्थेचे सचिव प्रमोद शिंदे  यांनी अभिनंदन केले. या महाविद्यालयाने ग्रामीण भागामधील सर्वाधीक प्लेसमेंट देणारे महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!