वतन की लकीर (ऑनलाईन): कोरोनावर लस निर्माण करण्यामध्ये भारत एक-एक पाऊल पुढे टाकत असताना 2 जानेवारीपासून देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोना लशीचे ड्राय रन करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 300 दशलक्ष लस दिली जाणार आहे. देशातील कोरोना रूग्णांची संख्या एक कोटींच्या पुढे गेली आहे.
दि. 30 डिसेंबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 08 तर ग्रामीण भागातून 11 रुग्ण असे मिळून 19 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 91 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 10 व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून, इतर तालुक्यात सुद्धा एकही रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आला नाही. 30 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 06 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.
शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 19 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 5 हजार 777 रुग्ण असून, बरे झालेले 5 हजार 480 आहे तर मृत्यू झालेले एकशे सदोतीस आहेत.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर 16 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 03 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरीकांनी सतत मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टेसिंग, गर्दीत जाणे टाळणे गरजेचे आहे.