अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): केंद्र सरकारने शेतकरी विधेयक मंजूर केले त्याच्या विरोधात संपूर्ण भारत बंद करण्यात आला होता. त्यानिमित्त गोतंडी गावासह संपूर्ण इंदापूर तालुका कडकडीट बंद ठेवण्यात आला होता.
गावातील सर्व दुकानदार व्यापारी व ग्रामस्थ यांनी शेतकरी बंदला मोठा पाठिंबा दिला होता. जय जवान, जय किसान व शेतकरी काळा कायदा रद्द करण्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.