बारामती(वार्ताहर): प्रीतम शहा यास आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक असलेल्या बबलू देशमुखांसह पाच जणांचा वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.टी.भालेराव यांनी जामीन मंजूर केला.
जयसिंग उर्फ बबलू देशमुख, संजय काटे, विकास धनके, प्रविण गालिंदे व सनी आवाळे यांचा जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणात मंगेश ओमासे आणि संघर्ष गव्हाळे हे दोघे अद्यापही फरार आहेत.
व्यापारी शहा यांनी सावकारांच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली. प्रतीक शहा याचे फिर्यादीनुसार व सुसाइड नोट नुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात नऊ सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील सात जण अटक होते. सुरूवातीला चार दिवस पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.
जयेश उर्फ कुणाल काळे व हनुमंत गवळी यांना न्यायालयीन कोठडी आहे. यांच्या जामीन अर्जावर निर्णय झालेला नाही. असाच एक गुन्हा शहर हद्दीत घडला असताना, यामधील 5 आरोपींपैकी एकास अटक व इतरांनी अटकपूर्व जामीन मांडला आहे. अटक आरोपीस दुसर्या दिवशी न्यायालयीन कोठडी मिळाली. यामुळे असा दुजाभाव का? असेही नागरीकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.