बारामती(वार्ताहर): मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या सामाजिक संस्थेच्या बारामती तालुका (ग्रामीण) अध्यक्षपदी अस्लम (वस्ताद) हुसेन शेख यांची निवड करण्यात आली.
मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे संस्थापक अध्यक्ष विकास एस.कुचेकर यांनी नुकतेच श्री.शेख यांना नियुक्ती पत्र दिले आहे. अस्लम शेख यांची सामाजिक कार्याची आवड पाहता त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भालचंद्र सर्जेराव महाडिक यांनी सांगितले आहे. अस्लम शेख यांचा दांडगा जनसंपर्क व तळागाळातील वंचित लोकांच्या मदतीला धावणे त्यांना मदत करणे या सर्व बाबींचा विचार करून तालुक्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.