बारामती(वार्ताहर): दि. 22 नोव्हेंबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 14 तर ग्रामीण भागातून 20 रुग्ण असे मिळून 34 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 37 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 2 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसुन इतर तालुक्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहे. 78 रुग्णांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 22 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. काल दिवसभरात बारामतीत एकूण 34 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 4 हजार 666 रुग्ण असून, बरे झालेले 4 हजार 312 आहे तर मृत्यू झालेले एकशे चोवीस आहेत.
काल तालुक्यामध्ये खाजगी रुग्णालयात rt-pcr 18 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 10 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.
दिनांक 21 नोव्हेंबर 20 रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या 110 जणांचा rt-pcr तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहर व तालुक्यातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही. ही बाब बारामतीकरांसाठी आनंदाची बाब आहे तरी निष्काळजीपणे राहता कामा नये. वेळोवेळी मास्क, सॅनिटाइजर चा वापर करुन गर्दीत जाणे टाळा. दिवाळीचा जसा सर्वांनी आनंद घेतला तो आनंद द्विगुणित होण्यासाठी कोरोना विषाणू शी सावध रहा.