बारामती: मनसेच्या डॅशिंग नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे या पुणे पदवीधर मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे.
रूपाली पाटील यांनी सन 2012 ते 2017 च्या दरम्यान पुणे महापालिकेच्या नगरसेविका म्हणून काम केले. मनसे विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्षा तर पुणे मनसेच्या महिला शहराध्यक्षा म्हणून सध्या त्या कार्यरत आहेत. महिला, युवक-युवतींची प्रश्र्न मार्गी लावण्यावर त्यांचा भर असतो. विद्यार्थ्यांच्या प्रश्र्नांवर आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी तुरूंगवास सुद्धा भोगला आहे. बी.कॉम. एलएल.बी. शिक्षण त्यांनी घेतलेले आहे. शैक्षणिक व सामाजिक कार्यातून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. विधी क्षेत्रात त्यांनी कामाचा ठसा उमटविला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षात पदवीधर आमदारांनी पदवीधरांसाठी काहीही केलेले नाही. त्यांचे प्रश्र्न योग्यरीत्या मांडले जात नाहीत. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील सरकारने नियुक्ती रखडवली होती त्यावेळी रूपाली पाटील यांनी स्वत: रस्त्यावर उतरून संघर्ष केला व काम मार्गी लावले. पदवीधरांना यापुर्वी कोणताही उमेदवार भेटावयास गेला नाही. मात्र, रूपाली पाटील या स्वत: भेटायला जात आहे आणि युवकांची मने जिंकत आहेत. कोरोना काळात पायात भिंगरी बांधल्यासारख्या त्यांनी विविध रूग्णांची मदत केली. विविध हॉस्पीटलला भेटी दिल्या तेथील निष्क्रीय व्यवस्थापनाला जागं केले. महिलांचे प्रश्र्न मार्गी लावले.
कामात नाव व नावात काम त्यांनी केलेले आहे. अन्यायग्रस्तांच्या मदतीला धावणार्या रूपाली पाटील आहेत. अशा महिला आमदार जर युवक-युवतींना भेटल्या तर अन्याय करणार्याला सुद्धा विचार करावा लागणार आहे. कोणत्याही कार्यात स्वत: उतरून कार्य सिद्धीस नेणार्या रूपाली पाटील आहेत. त्यामुळे अशा उमेदवारास पदवीधरांनी निवडून दिल्यास नक्कीच प्रश्र्न उपस्थित होण्यापुर्वी खाली बसतील असेही पदवीधरांमध्ये बोलले जात आहे.