पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांचा सत्कार!

भवानीनगर (वार्ताहर): दिवाळी हा सण विविध रंगांची उधळण व नाती नव्याने दृढ करणारा सण आहे. यामध्ये मित्रत्वाचे नाते मागे राहूच शकत नाही. असेच एक मित्र आनंद भोईटे यांचे पिंपरी चिंचवड शहर पोलीस उपायुक्तपदी बढती झालेने मित्रांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे बलिप्रतिपदा हा महत्वाचा सण म्हणून साजरा केला जातो अशा मंगलमय प्रसंगी भवानीनगर (ता.इंदापूर) येथील भवानी माता मंदिर येथे श्री छत्रपती हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी साशेल डिस्टन्स्‌चे पालन करीत एकत्र येऊन सत्कार करण्यात आला.

गप्पांची मैफिल रंगली, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, सर्वांनी आपआपली खुशाली विचारली. कोरोनाने सर्व जनजीवन विस्कळीत झाले. यामध्ये कोणाला कोरोनाचा संसर्ग झाला त्यातून ते सुखरूप बाहेर आले तर कोणाचे आई-वडिल, पै-पाहुणे, नातेवाईक काळाच्या पडद्याआड गेले हे सर्व ऐकून मन सुन्न झाले. सर्वांनी एकमेकांना धीर दिला. मास्क, सॅनिटायझर व गर्दी टाळून जीवन व्यथित करण्याचा अनमोल संदेश यावेळी देण्यात आला.

यावेळी आनंद भोईटे, सचिन भोईटे, विजय काटे, विक्रम निंबाळकर, शरद ढवाण, ऍड.जब्बार सय्यद, सागर महामुनी, तानाजी सपकळ, शेखर काटे, आप्पा क्षीरसागर, गणेश वायशे, डॉ.किरण जगताप, सचिन गायकवाड, जावेद कबीर, शेखर काटे, नितीन सपकळ, सचिन घुले, नाना शेंडगे तैनुर शेख इ. उपस्थित होते.

भवानी मातेचे दर्शन घेऊन सर्वांना कोरोनाशी दोन हात करून लढण्याची शक्ती दे अशी यावेळी प्रार्थना करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!