बारामती(वार्ताहर): दि. 06 नोव्हेंबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 14 तर ग्रामीण भागातून 04 रुग्ण असे मिळून 18 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 97 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 08 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत तर एकही रुग्ण प्रतिक्षेत नसुन इतर तालुक्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.
52 रुग्णांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 06 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. काल दिवसभरात बारामतीत एकूण 18 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे.
बारामतीत 4 हजार 328 रुग्ण असून, बरे झालेले 4 हजार 089 आहे तर मृत्यू झालेले एकशे एकोणीस आहेत.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत rt-pcr 06 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 4 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.
अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट येताना दिसत आहे. लॉकडाऊन जाहिर केले आहे हे विदेश आहे म्हणुन दुर्लक्ष करुन चालणार नाही. आपला शेजारील देश पाकिस्तान याठिकाणी दुसरी लाट सुरू झाल्याची तेथील आरोग्य खात्याने कबुली दिली आहे. आपल्याकडे दिल्ली व इतर राज्यात कोरेनाने डोकं वर काढले आहे हे विसरुन चालणार नाही. हिवाळ्यात कमी तापमान आणि कमी आद्रता यामुळे हे विषाणू श्वसनसंस्थेच्या स्त्रावामध्ये अधिक काळ तग धरुन बसतात. वारा कमी असल्याने विषाणू पसरु लागतो. त्यामुळे नागरीकांनी गहाळ राहता कामा नये सतत मास्कचा वापर करावा, सॅनिटाइजर वापरावे व गर्दीत जाणे टाळावे. उत्तर भारतात थंडीची लाट येण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.