बारामती(वार्ताहर) : येथील पवार कुटुंबियांचे विश्वासू, अभ्यासु, राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे निष्ठावंत किरण बबनराव गुजर यांना होणार्या पदवीधर मतदार संघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी बारामती लोकसभा संघातील पदवीधर करताना दिसत आहे.
बारामती लोकसभा,विधानसभा पासुन ते प्रत्येक तालुका व जिल्यातील कोणतीही निवडणुक असो ना. अजित पवार यांच्या आदेशान्वय त्याचे चोख व्यवस्थापन किरण गुजर करीत आले आहेत. कागदोपत्रीचा बादशाह म्हणुनही त्यांची एक अनोखी ओळख आहे. कोणत्याही राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कामाचे नियोजन कसे असावे हे किरण गुजर यांचेकडून शिकावे तेवढे कमीच आहे. निवडणुकीत अचूक उमेदवाराचा अर्ज दाखल करणे, कोणता उमेदवार किती मते घेईल, सर्व जाती, पोट-जाती, त्यांची लोकसंख्या याचा गाढा अभ्यास असणारे किरण गुजर आहेत. कोविड-19 च्या पार्श्र्वभूमीवर त्यांनी कोणताही भेदभाव न करता त्या रूग्णास मदत कशी होईल याकडे जातीने लक्ष दिले. स्वत: पुढाकार घेऊन कोविड सेंटर उभारले त्यातून रूग्णांची सेवा केली. कोणत्याही विषयाची पुरेपुर माहिती व अभ्यास केल्याशिवाय ते कधीही बोलत नाही. चुकीच्या गोष्टींना कधीही पाठिशी घालीत नाही. जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराची वैयक्तिक ओळख आहे. त्यांच्या कामाचा झपाटा पाहुन युवक वर्ग त्यांचा चाहता झालेला आहे.
अशा सर्व गुण संपन्न असणार्या व सतत बारामती व बारामतीच्या नेत्यांचे हीत पाहत आलेल्या निष्ठावंत किरण गुजर यांना पदवीधर मतदार संघातून उमेदवारी दिल्यास नक्कीच ते निवडून येतीलच व सर्वांना सर्वसामान्य कुटुंबातील आमदार तो ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाला याचे मनोमन समाधान व्यक्त केले जाईल.