बारामती(वार्ताहर): येथील सर्वसामान्य कार्यकर्ता अक्षय गायकवाड यांची भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व सोशल मिडीयाचे प्रदेश संयोजक प्रविण अलई यांनी नुकतीच पश्र्चिम महाराष्ट्र सोशल मिडीया सहसंयोजकपदी पत्र देवून निवड केली.
राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शुभेच्छांचे पत्र देवून अक्षय गायकवाड यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले आहे. असे इतर पक्षात पहावयास मिळत नाही, हे वाखण्याजोगे आहे.
पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारून ती जबाबदारी तन-मनाने पार पाडेन असे अक्षय गायकवाड यांनी पदस्वीकारताना सांगितले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संयोजक सोशल मिडीया प्रविण अलई, रविंद्र अनासपुरे, यशपाल भोसले, पियुष कश्यप, चंद्रभूषण जोशी, निखिल पंचभाई व सर्व हितचिंतकांचे आभार त्यांनी मानले आहेत.