कोरोनातील दसरा: सर्वांना शुभेच्छा!

अश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जातो यालाच दसरा असे म्हटले जाते. केरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व सण उत्सव मर्यादित झालेले आहेत. चार भिंतीच्या आत काय असेल ते अशी परिस्थिती ओढवलेली आहे.

दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. या दिवशी नवनविन वस्तु खरेदी केलकेली जाते. नविन व्यवसायाचा आरंभ केला जातो. या दिवशी गावाच्या सिमा ओलांडुन जाण्याची प्रथा प्रचलित आहे. एकमेकांचे स्नेहाचे संबंध वाढावे म्हणुन आपट्याची पाने सोनसोनं म्हणुन देताना. जी पाने लुटली जातात ती पाने खाल्ल्याने कफ व पित्त कमी होतात आज केरोनाच्या विषाणुत कुटुंबातील वृद्ध या कफ व पित्ताचे शिकार झाले आहेत.

सध्या सर्वच पॉझिटिव्ह व निगेटिव्ह च्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. प्रत्येक समाजात जे सण उत्सव साजरा केला जातो त्यास काही ना काही शास्त्रीय कारण नक्की असते ते आपल्या पूर्वजांनी घालुन दिलेली प्रथा रुजविण्याचा प्रयत्न करीत असतो. यादिवशी शस्र पुजन केले जाते. मुलं सरस्वतीचे चित्र रेखाटून त्याची पुजा करतात वह्या, पुस्तके पुजतात. मला यश मिळो, विजयी होवो अशी प्रार्थना सुद्धा करतात. शेतकरी पहिले पीक आपल्या घरात घेऊन जातात. मात्र अतिवृष्टी मुळे काहींचे पहिले पीक तर जलमय झाले त्यामुळे दसरा साजरा कसा करायचा हा प्रश्न सुद्धा त्यांना पडलेला आहे. शेतात उगवलेले पीक त्याचा तुरा टोपी, फेट्यात किंवा कानात लावतात. मात्र पीकच जलमय झाले तर करायचे काय त्यामुळे चोहुबाजुने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे.

कोरोनामुळे गरीब व श्रीमंतांची सुद्धा वाईट अवस्था झालेली आहे. या वर्षी कमवायचे कमी पण आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी जगायचे कसे याचे सर्वांना प्रश्न पडलेला आहे. प्रशासन तुमच्या मदतीसाठी धावत आहे आपण आपली व विशेषता कुटुंबातील वृद्धांची काळजी घेतली पाहिजे. संकटाचे दिवस राहत नाही आज ना उद्या हे दिवस जातील माणुसकी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे आजही आपली भारतीय संस्कृती मौल्यवान आहे तिला पाश्चिमात्य देशाची सावली सुद्धा पडु देऊ नका. नाहीतर पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण सतत आपल्या भारतावर सुरुच आहे.

विविध समाज आपआपले सण उत्सव आजही एकत्र येऊन साजरे करतात शुभेच्छा देतात यालाच उच्चतम भारतीय संस्कृती म्हणतात. कोरोना विषाणूमुळे त्यास नजर लागली आहे पण ही नजर उतरवण्याची शक्ती प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये आहे त्यामुळे लवकरच आपण या विषाणु पासुन मुक्त होऊ हीच मनोमन प्रार्थना व सर्वांना दसरा निमित्ताने शुभेच्छा

संपादक- तैनुर शेख, बारामती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!