बारामती(वार्ताहर): दि. 23 ऑक्टोबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 11 तर ग्रामीण भागातून 31 रुग्ण असे मिळून 42 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 90 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 11 व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नाही. इतर तालुक्यात चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. 102 रुग्णांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 28 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. काल दिवसभरात बारामतीत एकूण 42 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 4 हजार 039 रुग्ण असून, बरे झालेले 3 हजार 796 आहे तर मृत्यू झालेले एकशे दहा आहेत.
काल मौजे मानाजी नगर व धुमाळवाडी येथे” माझे कुटुंब माझी जबाबदारी “या कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्याचे कोवीड संदर्भात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले त्यामध्ये मानाजी नगर येथे 31 संशयितांची एंटीजेन तपासणी केली असता त्यापैकी 07 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले तसेच धुमाळवाडी येथील 20 संशयितांची तपासणी केली असता त्यापैकी 8 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून पणदरे येथील 04 संशयितांची एंटीजेन तपासणी केली असता 02 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत असे एकूण 55 संशयित रुग्णांची तपासणी केली असता त्यापैकी 17 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.