बारामती(वार्ताहर): दि. 11 ऑक्टोबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 09 तर ग्रामीण भागातून 06 रुग्ण असे मिळून 15 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 33 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 10 व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नाही. इतर तालुक्यात चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत 11 रुग्णांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 15 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 3 हजार 710 रुग्ण असून, बरे झालेले 3 हजार 246 आहे तर मृत्यू झालेले एकशे दोन आहेत.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत rt-pcr 15 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 05 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.बारामतीत मृत्यू दर, रुग्ण संख्या व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहिल्यास कोरोना परतीच्या वारी चाललेला दिसत आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत केलेल्या तपासणीमुळे रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे. संपुर्ण महाराष्ट्राची स्थिती पाहिली असता रुग्ण संख्या कमी झालेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे संपर्ण महाराष्ट्र अनलॉक करणार असल्याचे बोलले आहेत. हे सर्व श्रेय प्रत्येक गाव व तालुक्याच्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस व इतर सामाजिक संस्थेला जात आहे.