बारामती(वार्ताहर): “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या उपक्रमांतर्गत दि. 09 ऑक्टोबर व वाणेवाडी व 10 ऑक्टोबर रोजी मुरुम या ठिकाणी ऍक्टिव्ह सर्वे करण्यात आला. यामध्ये एकुण 15 रुग्ण कोरोना बाधित आढळुन आले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळविले आहे.
याठिकाणी एकूण 100 संशयितांपैकी 100 जणांची एन्टीजेन टेस्ट करण्यात आली. वाणेवाडी येथे 14 व मगरवाडी येथे 01 असे एकूण 15 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या =3674 झालेली आहे.