बारामती(वार्ताहर): दि. 08 ऑक्टोबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 14 तर ग्रामीण भागातून 09 रुग्ण असे मिळून 23 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 144 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 08 व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. एक रुग्ण प्रतिक्षेत आहे. इतर तालुक्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. 67 रुग्णांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 15 पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 23 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 3 हजार 632 रुग्ण असून, बरे झालेले 3 हजार 086 आहे तर मृत्यू झालेले सत्त्यान्नव आहेत.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत rt-pcr 04 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला नाही.
कोरोना बाधितांमध्ये बारामतीत 100 च्या वर रुग्ण संख्या होती. मात्र प्रशासनाने घेतलेल्या कष्टाचे व नागरीकांनी वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केल्याने आज बारामतीत दिलासादायक रुग्ण संख्या दिसत आहे. कोरोना कमी झाला म्हणुन गहाळ राहता कामा नये. डेंग्यू डोकं वर काढीत आहे. काहींना डेंग्यू ची लागण झालेली आहे आपण सतर्क राहण्याची गरज आहे.