बारामती(उमाका): राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 2020-21 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये सांगाडा उभारणी , प्लास्टिक टनेल, पॉवर नॉपसॅक स्प्रेअर, प्लास्टिक कॅरेट इत्यादी बाबी करीता 50% अनुदान रक्कम रूपये दोन लाख तीस हजार रूपये प्रति रोपवाटिका प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
रोपवाटिका प्रकल्प स्वरूपात राबवायचे असल्याने उपरोक्त चारही घटकांची एकाच ठिकाणी उभारणी बंधनकारक आहे. टोमॅटो , वांगी , कोबी , फुलकोबी , मिरची , कांदा व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका उभारणी आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांकडे स्वत:च्या मालकीची 0.40 हेक्टर जमीन व पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य , महिला गट / महिला शेतकरी यांना व्दितीय प्राधान्य तर भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहील.
या योजनेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असणार्यांनी हींींिी;//ारहरवलींारहरळीं. र्सेीं.ळप या संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे 02 ऑक्टोबर 2020 ते 19 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज सादर करावेत असे, आवाहन तालुका कृषी अधिकारी बारामती दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.