बारामती(वार्ताहर): दि. 05 ऑक्टोबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 15 तर ग्रामीण भागातून 17 रुग्ण असे मिळून 32 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 119 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते त्यापैकी फक्त 01 व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे. 84 रुग्णांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. इतर तालुक्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. 90 रुग्णांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 21 पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 32 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 3 हजार 520 रुग्ण असून, बरे झालेले 2 हजार 885 आहे तर मृत्यू झालेले नव्वद आहेत.
काल खाजगी प्रयोगशाळेत 35 जणांची rt-pcr तपासणी करण्यात आली त्यापैकी 10 जण पॉझिटिव्ह आले अाहेत. कोरोनाची परिस्थिती पाहिली असता शहर व तालुक्यात आटोक्यात आली असुन बारामतीकरांना दिलासा देणारी रुग्ण संख्या आहे. प्रशासनाचे यश कामी आले आहे. प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन नागरीकांनी केल्याने आज दिलासादायक परिस्थिती समोर आहे.