हाथरस प्रकरणावरून तरी जातीव्यवस्था थांबविणारे नेतृत्व मिळेल का?

बारामती(वार्ताहर): उत्तर प्रदेशच्या आतापर्यंत घडलेल्या प्रकरणांतून एक सारांश काढता येईल की, दलित असणे, स्त्री असणे आणि गरीब असणे या गोष्टींमुळे स्त्रीयांच्या वाट्याला हाथसर सारखे प्रकरण कारणीभूत ठरत आहेत. युपी-बिहारमध्ये बलात्कार प्रकरणात जातीची पार्श्र्वभूमी त्या प्रकरणाची तीव्रता अधिक वाढवते. जातीमुळे दबावतंत्राशी लढताना राजकीय यंत्रणा, शासन-प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही त्यामुळे संघर्षाची ज्वाला अधिकच भडकत जाते.

सन-2012 मध्ये दिल्ली बलात्कार प्रकरण (चालत्या बसमध्ये), हैद्राबाद डॉक्टर तरूणीवर बलात्कार, उत्तर प्रदेशमधील उन्नाव प्रकरण, जम्मूमधील कठुआ प्रकरण, महाराष्ट्रातील खैरलांजी, कोपर्डी बलात्कार प्रकरण, हिंगणघाट प्राध्यापिकेला भर रस्त्यावर जाळणे आणि आता हाथरस प्रकरण या सर्व प्रकरणातुन प्रशासनाचा व कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नाही. जाती व्यवस्थेतून होणार्‍या अन्यायाला थांबविणारे नेतृत्व पाहिजे.

आजकाल बलात्कार झाला की, पिडीत मुलगी कोणत्या जातीची व अत्याचार करणारा कोणत्या जातीचा याकडे पाहिले जाते व राजकारण केले जाते ही खुप निंदनीय बाब आहे. किती राजकीय मंडळींनी आवाज उठविला, कोण पुढे आले. एका अभिनेत्रीला हाथाशी धरून राजकारण करणारे कुठे गेले. जी अभिनेत्री स्त्रीचा बुरखा पांघरून बोलत होती या प्रकरणात एक शब्द नाही म्हणजे राजकारण कोणत्या स्तराला गेले आहे याचा अभ्यास सर्वांनी करण्याची गरज आहे.

अशा प्रकरणांमुळे संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत असतो. राजकीय मंडळी एकमेकांवर ताशेरे ओढण्यात मग्न आहेत. आरोपी हा आरोपी असतो त्यास कोणतीही जात,धर्म, वंश, परंपरा किंवा पक्ष नसतो. जर एखादा पक्ष जर त्या आरोपीस पाठीशी घालीत असतील तर त्या पक्षाचा नायनाट मतदारांनी करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम होत आहे. ज्या राज्यात आपले सरकार नाही त्याठिकाणी केंेद्राची वेगळी भूमिका आणि ज्या राज्यात सत्ता आहे त्याठिकाणी झुकते माप, याला काय म्हणायचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!