बारामती(प्रतिनिधी): चाकू ने हल्ला केल्याच्या खटल्यामध्ये बारामती येथील न्यायाधीश पी.एम.पाटील साहेब यांनी ॲड.धीरज लालबिगे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
पवन सोपान पिंगळे, दशरथ खंडू कोळपे, सोपान बबन पिंगळे, देवीदास सत्तू मोट यांचे विरुद्ध फिर्यादीला चाकू मारुन जीवे मारण्याची धमकी दिली असा गुन्हा नोंद झाला होता. या खटल्यामध्ये सरकार पक्षाकडून एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये स्वतः फिर्यादी आणि दोन डॉक्टर व दोन पंच यांचा समावेश होता. फिर्यादीला झालेली जखम ही सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही. आणि जप्त चाकू किंवा कुऱ्हाड ही या गुन्ह्यात वापरले हे सिद्ध करता आले नाही म्हणजे हत्यार जप्ती पंचनामा, मेडिकल सर्टिफिकेट सरकारकडून सिद्ध करता आले नाही. त्यामुळे आरोपी विरुद्ध बेकायदा जमाव जमवून चाकूने वार केला हे गुन्हा सिद्ध होत नाही जमीनीच्या वाद वरून खोटी केस केली आहे म्हणून आरोपी ची निर्दोष मुक्तता करण्यात यावी असे आरोपी यांचे वकील धीरज माणिक लालबिगे यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरून मे कोर्ट ने आरोपी यांची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यामध्ये ॲड.धीरज लालाबिगे याना ॲड.रुपाली माळवदे ॲड.दिपाली माळवदे, ॲड.रोहन कांबळे, ॲड.धीरज गावडे, ॲड.ओमकार क्षिरसागर यांनी सहायक म्हणून काम पाहिले.