पक्षात एक उगवती किरण असताना, दुसऱ्या मावळत्या किरणची काय गरज…

बारामती(प्रतिनिधी): नावलौकीक असलेल्या पक्षात एक उगवती किरण असताना, दुसऱ्या मावळत्या किरणची काय गरज अशी चर्चा बारामती शहरात सध्या सुरू आहे. पक्ष धर्मनिरपेक्ष काम करीत असताना, सध्या जातीवादाला सामोरे जावे लागत असेल तर पक्ष श्रेष्ठींनी जातीवाद करणाऱ्यांवर लगाम लावण्याची गरज आहे.

सध्या बारामती शहरात एका गंभीर गुन्ह्या विषयाची चांगलीच चर्चा रंगली आहे. म्हणे या विषयातील किशोरवयीन मुलासारखे कृत्य करणाऱ्या आरोपीला नेत्याकडे पदाची शिफारस याच किरणने केली. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात हा किशोरवयीन आरोपी पुढे असायचा, कुठे फिरायला जायचे म्हटले, कार्यक्रमाला जायचे म्हटलं की, किशोरवयीन आरोपी पुढे…एवढेच नव्हे तर हा किशोरवयीन आरोपी म्हणत असे… आदरणीय किरणच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली कामे सुरू आहेत.

असे म्हटल्यावर आज जे या किशोरवयीन आरोपीने गैरकृत्य केले त्याचे बोलाचे, कृत्याचे धनी किरणच आहे का काय असेही नागरिकांमध्ये बोलले जात आहे. आज जर खरंच या किरणने नेत्याकडे याची शिफारस केली असेल तर नैतिक जबाबदारी म्हणून किरणने सुद्धा राजीनामा देण्याची गरज आहे.

किशोरवयीन आरोपी नेत्यासमोर सुद्धा दारू पिऊन छाती ठोकपणे उभा राहत होता. पदाची खैरात मिळाली त्या दिवशी सुद्धा दारू पिलेला होता. म्हणे, किरणने त्यावेळी नेत्यांना सुद्धा याच्याबाबत खोटं व दिशाभूल करणारे वक्तव्य केले. आजही या किशोरवयीन आरोपीला किरण योग्य, पक्षाची, नागरिकांची विशेषतः पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी कशी दिशाभूल होईल असे मार्गदर्शन करीत असल्याचेही बोलले जात आहे.

परावर्तित किरणाचा अर्थ ज्याला कळाला तो या किरण पासून दूर गेलेला दिसत आहे. गर्दीत हात सोडून देणारा किरण असल्याचे बोलले जात आहे. परावर्तित किरण चकाकणाऱ्या वस्तुवर पडतात आणि परत फिरतात हे सांगण्याची गरज नाही. या किरणने अति प्रकाशित होण्यासाठी काही भिंगाचा वापर केला. या किरणने वापरलेल्या भिंगामुळे विनाकारण काही जणांचे व या किरणच्याच जवळच्या व्यक्तींचे सामाजिक, राजकीय क्षेत्रात नुकसान सुद्धा झाले. या किरणने ज्या-ज्या लोकांचा भिंग म्हणून वापर केला त्यांनी येणाऱ्या काळात सावध झाले पाहिजे.

या किरणमुळे नेत्यांना सुद्धा किती त्रास झाला हे पाहणे गरजेचे आहे. पक्षात कोणाची ताकद नाही, निवडणूक काळात झालेला हिशोब द्या म्हणण्याची एवढी दहशत किरणची का? पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी तोडण्याचे काम याच किरणने केले. किरणोत्सर्गाचे दुष्परिणामामुळे पक्षाकडे काही कार्यकर्ते व पदाधिकारी फिरकत सुद्धा नाही. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी या किरणचा व किरण वापरीत असलेल्या भिंगांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अन्यथा येणाऱ्या काळात याच किरण मुळे बांधले तोरण, पक्षापासून कोसो दूर लांब कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मरण! अशी म्हणण्याची वेळ येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!