भिगवण(प्रतिनिधी हेमंत भोसले): येथील उजने एक्सप्रेसचे संपादक व भिगवण पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अमोल बापुराव कांबळे यांनी कल्याण वालधुनी बुद्धभूमीत बुद्धांच्या मुर्ती हटवल्या व भिक्खू संघावर हल्ल्याच्या निषेधार्थ एक दिवशीय लाक्षणिक उपोषण आज दि.5 जून 2026 रोजी करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रयमामा भरणे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी अनिल शेलार, चंद्रकांत मोरे, अजिंक्य माडगे, प्रदीप अण्णा वाक्षे, रोहित शेलार, जावेद शेख, राजू गाडे, शशिकांत जगताप इ. उपस्थित होते.
शहर विकासात भर घालणारा आणि कल्याण ते उल्हासनगर, कल्याण पूर्व, विठ्ठलवाडी भागाची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणाऱ्या वालधुनी ते विठ्ठलवाडी दरम्यानच्या 24 मीटर रूंदीच्या चार पदरी पुलाच्या उभारणीत बुद्धभूमी फाऊंडेशनची अतिक्रमणे नोटीस देऊन पालिकेने कारवाई कारून काढली असे सांगण्यात येत आहे.