राष्ट्रवादीची गणिते चुकल्याने प्रभाग 15 मध्ये यशपाल पोटेंचे पारडे जड! : राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज

बारामती(प्रतिनिधी): बारामती नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 ची रणधुमाळी सुरू असताना, काही प्रभाग असे आहेत की, त्या प्रभागावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. त्यामध्ये प्रभाग क्र.15ब या प्रभागात तीन अपक्ष तर तीन पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेते. मात्र, खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र बबनराव गुजर व अपक्ष उमेदवार यशपाल सुनिल पोटे यांच्यामध्ये दिसत असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

सुभाष चौकातील मारूतीरायाला नारळ फोडून यशपाल पोटे यांचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी यशपालच्या पाठीवर थाप टाकून लढ म्हणणारे वडिल सुनिल हरिभाऊ पोटे हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी फटाक्याची अतिषबाजी करीत, ढोल ताशांच्या गजरात बहुसंख्य युवकांची तोबा गर्दीने प्रभागात मिरवणुक काढण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुनिल सस्ते, विष्णु चौधर यांची एन्ट्री तसेच सुनिल पोटे यांच्या बहिणीला उमेदवारी देऊ केल्यामुळे हा प्रभाग क्र.15 चा गड सहज जिंकता येईल असे अनेक पुढाऱ्यांना वाटू लागले होते. इंगळे किंवा काळेंच्या घरात देण्यात येणारी उमेदवारी नामनिर्देशन दाखल दिवशी दुपारच्या दरम्यान जितेंद्र गुजर यांना देऊ केली आणि अपेक्षित नसलेला या दोन्ही कुटुंबाला धक्काच बसला.

या प्रभागात समाजाचे गणित पाहता सदरची जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. प्रभागामध्ये अंदाजे मराठा समाजाचे 600 व व्यापाऱ्यांचे 600 असे मतदान आहे. येथुन मराठा समाजाला किंवा व्यापाऱ्यातून उमेदवार देणे गरजेचे होते. या दोन्ही समाजाला डावलून तसेच ज्या कोल्हाटी समाजाला नगरपरिषदेच्या प्रत्येक निवडणूकीत उमेदवारी दिली जात होती त्या समाजाचा विचार केला नाही आणि त्रयस्त इसमाला उमेदवारी दिली नाही. याच प्रभागातील ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर हे 2007 पासून नगरपरिषदेमध्ये स्विकृत नगरसेवक म्हणून आहेत व पुढच्याही कौन्सिलमध्ये येऊ शकतात असे असताना देखील वरील समाजाचा विचार न करता प्रभाग एकतर्फी आहे असे समजून (नुरा कुस्ती) त्यांनी स्वतःच्या भावाला उमेदवारी देऊ केली.

याच प्रभागातून यशपाल सुनिल पोटे यांनी अचानक उमेदवारी दाखल केली. तद्नंतर पक्षाने पोटे यांच्यावर दबाव व स्विकृतचे अमिष दाखवीत अर्ज माघारी घेण्याबाबत तगादाला लावला. समाजाच्या बैठकीत सुनिल पोटे यांनी खाजगीत सांगितले की, मी यशपालला मदत करणार नाही. परंतु, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या उमेदवाराने त्या वाक्याचा अपप्रचार करीत ते यशपाल पोटे यांच्या मागे नसून जितेंद्र गुजर यांच्यामागे असल्याबाबत मिडीयामध्ये प्रसिद्धी दिली. या प्रसिद्धीमुळे वडिल मुलाच्या नात्यामध्ये गैरसमज पसरविण्याचे काम केल्यासारखे झाले. ही गोष्ट सुनिल पोटे यांच्या मनाला लागल्यामुळे त्यांनी आजपासून मुलाच्या प्रचार उघडपणे करण्याचा निर्णय घेतला हे प्रचार सभेत सर्वच मतदार बघत राहिले.

ज्येष्ठ नेते किरण गुजर आज कित्येक वर्ष झाले बारामतीच्या राजकारणातील पितामह म्हणून समजले जातात त्यांच्याकडून अशी गणिते चुकली कशी असे प्रभागात बोलले जात आहे. या सर्व बाबींचा विचार करून सुनिल पोटे यांनी प्रभाग क्र.15 ची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

कोल्हाटी समाजाला उमेदवारी न देणारे कोण? एक भाऊ कायम स्विकृत असताना, दुसऱ्या भावाला उमेदवारी का? याबाबत प्रभाग क्र.15 मध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

पक्षाची एकनिष्ठ, वेळ देणारे विधानसभा, लोकसभा निवडणूकीत काम करणऱ्यांना डावलून उमेदवारी दिल्याने कितपत योग्य असल्याचे येथील मतदारांमध्ये बोलले जात आहे. या निवडणूकीत लाळघोटेपणा करणाऱ्यांना उमेदवारी व पक्षाची एकनिष्ठेने काम करणाऱ्यांना उमेदवारी दिली गेली नाही याचा सद्सद्विवेक बुद्धीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी करण्याची गरज आहे.

सध्या तरी यशपाल पोटे यांचे पारडे जड दिसत आहे. असाच प्रचाराचा वेग राहिल्यास, युवकांमध्ये यशपालबाबत वेगळीच ओळख असल्याने 3 डिसेंबर रोजी कोणाच्या डोक्यावर गुलाल पडेल हे पाहणे उत्सुकता लागलेली दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!