इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक स्वप्नील राजेंद्र राऊत यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा सविस्तर कार्यअहवाल जनतेसमोर सादर केला आहे.
स्वप्नील राऊत यांनी आपल्या कार्यकाळात “विकास, पारदर्शकता आणि जनसेवा” या तत्त्वांवर आधारित प्रशासन दिल्याचे सांगितले. प्रभागातील नागरिकांसाठी रस्ते, गटारे, पाणीपुरवठा व्यवस्था, सार्वजनिक लाईट सुविधा अशा अनेक मूलभूत सोयी-सुविधा उभारून दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यावर त्यांनी भर दिला.
कार्यअहवालात मागील पाच वर्षांत पूर्ण झालेली प्रमुख विकासकामे, मंजूर प्रकल्प, प्रलंबित योजना तसेच आगामी काळासाठी आखलेला विकास आराखडा या सर्वांचा सविस्तर आढावा देण्यात आला आहे. नागरिकांसमोर पारदर्शक कामकाजाचा आदर्श निर्माण करण्याचा हा उपक्रम असल्याचे राऊत यांनी नमूद केले.
दरम्यान, सदर प्रभाग ओबीसी महिला आरक्षणासाठी राखीव असल्याने स्वप्नील राऊत यांच्या पत्नी दीप्ती राऊत या आगामी निवडणुकीच्या तयारीत आहेत. त्यांना प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गेल्या पाच वर्षांत नगरसेवक म्हणून स्वप्नील राऊत यांनी केलेल्या कामांचा ठसा या जनसमर्थनात स्पष्टपणे जाणवतो.
विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांतून दीप्ती राऊत यांचा वाढलेला संपर्क व कार्यतत्परता हा त्यांचा मोठा आधार ठरत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षासाठी निष्ठेने केलेले काम, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच कोरोना काळात लोकांना दिलेली मदत या सर्व पार्श्वभूमीवर या कामगिरी आणि जनआधाराच्या बळावर, पक्षाकडून या प्रभागात उमेदवारीसाठी दीप्ती राऊत यांच्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.
अनेक विकासात्मक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून राऊत दांपत्य पुन्हा जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज झाले आहे. प्रभागातील नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर ते या निवडणुकीला उत्साहात सामोरे जाण्याची तयारी करत आहेत.