काय बातमी लिहीली, कशी वाक्यरचना केली, आधी बातमी लिहायला शिका असे वाक्य संतराम घुमटकर यांनी पत्रकारीतेचा प्रारंभ करते वेळी काही पत्रकारांच्या घोळक्यातून ऐकावयास व कानी पडताना दिसत होती. मात्र, जेव्हापासून महाराष्ट्र टाईम्स् या दैनिकात वृत्तांकन करणे सुरू केले त्यावेळी पत्रकारांच्या घोळक्यातून जो नकारात्मक आवाज येत होता तो कानी पडण्याआधीच परतीची वाट धरत होता. असे आमचे मित्र महाराष्ट्र टाईम्स् या दैनिकाचे प्रतिनिधी संतराम घुमटकर यांच्या वाढदिवसानिमित्त जुनं आठवले ते मांडण्याचा प्रयत्न केला.
प्रत्येक माणसाच्या यशात काही ना काही नकारात्मक गोष्टी घडत असतात. त्याच नकारात्मक गोष्टी जीवनात टर्निंग पॉईंट होऊन बसतात हे प्रत्येक यशस्वी माणसाच्या जडणघडणीत पहावयास मिळते व त्या घटना अधोरेखित झालेली असते. सदरचा लेख मी कोणाच्या विरोधात लिहिलेला नाही हे प्रथमतः स्पष्ट करतो.
असाच टर्निंग पॉईंट संतराम घुमटकर यांच्याबाबत घडला आणि पाहता पाहता संतराम यांनी नकारात्मक गोष्टी कधी सकारात्मक केल्या आणि बातमी मागची बातमी देऊन सर्वांसमोर आरसाच ठेवला. आजही तो आरसा कुठेही मळलेला किंवा अस्पष्ट नाही हेही कौतुकाने सांगावेसे वाटते. पत्रकारिता करणे म्हणजे खरी तारेवरची कसरत आहे. मोठ-मोठ्या दैनिकांमध्ये स्पर्धा आहेत. कोणाची बातमी कशी याकडे वाचकांचे लक्ष असते. महाराष्ट्र टाईम्स् या दैनिकाची कोणाशी स्पर्धाच होऊ शकत नाही. कारण या दैनिकाकडे जाहिरातसाठी रांग लावावी लागते. बातम्यांचा सडा पडलेला असतो. भारतातील सर्वात मोठ्या मिडीयाच्या समूहांपैकी एक महाराष्ट्र टाईम्स आहे. या दैनिकाने विविध पुरस्कार प्राप्त केलेले आहे व करीत आहे हे वाखण्याजोगे आहे. संपूर्ण भारतात या दैनिकाने आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अशा नामवंत दैनिकात संतराम घुमटकर आपले म.टा.विशेष बातम्या देऊन सर्वांना विचार करण्यास लावीत आहेत ही खूप विशेष बाब आहे.
शोध पत्रकारितेतून अचूक माहिती गोळा करून, वृत्त ज्या व्यक्तीच्या अधिकाऱ्याच्या संबंधित आहे त्यांच्याशी समन्वय व संवाद साधून त्यांची प्रतिक्रीया घेऊन ती बातमी महाराष्ट्र टाईम्स या दैनिकाच्या माध्यमातून प्रसिद्ध करून लोकांपर्यंत पोहचवून प्रभाव निर्माण करण्याचे योग्य काम संतराम घुमटकर गेली 15 वर्षे झाली करीत आलेले आहेत.
समाजातील चुका ज्याप्रमाणे पत्रकार लोकांसमोर मांडतो, ती ज्याची चुक आहे त्याने मनात राग न धरता ती चुक स्वीकारून चाकोरीबद्ध चालण्यासाठी त्या पत्रकाराने किंवा त्या वृत्तपत्राने दिलेला एकप्रकारे संदेशच असतो. तशाच प्रकारे एका पत्रकाराने दुसऱ्या पत्रकारांच्या चुका काढल्याच पाहिजे, कारण ती चुक पुन्हा घडू नये व दर्जेदार, हृदयस्पर्शी लिखान होण्यास मदत होते. चुक काढली म्हणून त्या पत्रकारावर राग न धरता तो माझ्या यशातील खरी गुरूकुल्ली तीच होती असे समजून पुढे चालले पाहिजे. हीच वृत्ती संतराम घुमटकर यांनी ठेऊन महाराष्ट्र टाईम्स्च्या माध्यमातून उत्तुंग भरारी घेत आहेत.
पत्रकारिता आपल्या वाचकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत विकसित होत असते. तोच धागा धरीत संतराम घुमटकर यांनी वाचकांच्या बुद्धीला चालता मिळेल असे वृत्तांकन करून समाजात जनजागृती केली आहे. लोकशाहीचे चार स्तंभ आहेत त्यामध्ये पत्रकारिता चौथा मजबुत न ढासळणारा स्तंभ आहे. त्याच पत्रकारितेमध्ये सुद्धा चार स्तंभ निर्माण झालेले आहे. त्यापैकी दोन स्तंभ आजही आपले अस्तित्व व विश्वासार्हता टिकवून आहेत. प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया, डिजीटल मिडीया आणि सोशल मिडीया हे चार स्तंभांपैकी सध्या डिजीटल मिडीया आणि सोशल मिडीयाने जरी वाचकांच्या क्षणात गरजा पूर्ण करीत असतील तरी विश्वासार्हत यांनी गमावलेली दिसून येते. अशा स्पर्धेच्या युगात विशेषतः कोरना काळापासून प्रिंट मिडीयाला गळती लागली होती. मात्र, संतराम घुमटकर सारख्या दर्जेदार, वाचकीय लिखानातून पुन्हा एकदा वाचक प्रिंट मिडीयाकडे वळविण्याचे चोख काम त्यांनी केले. त्यांच्या नावातच राम आहे त्यामुळे ते कामात राम पाहूनच काम करीत असतात.
अशा निर्भिड, निस्वार्थी व खंबीर पत्रकारास क-दर्जा असणाऱ्या लघुवृत्तपत्रक साप्ताहिक वतन की लकीर संपादक तैनुर शफिर शेख यांच्यातर्फे मनःपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! यापुढे अशीच तुमची व महाराष्ट्र टाईम्स या दैनिकाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच ईश्वराजवळ प्रार्थना. शेवटी एकच सांगतो निंदनाचं घर असावं शेजारी या उक्तीप्रमाणे आपल्या यशाला अशाच लोकांची गरज असते, त्यांच्यावर नाराज न होता त्यांनाच आपल्या यशाचे शिल्पकार समजून एक पाऊल पुढे टाकीत काम करीत राहा हीच पुन्हा एकदा सदिच्छा!