आमदार इद्रिस नाईकवडी यांच्या शुभहस्ते बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा नागरी सत्कार!

बारामतीः नुकत्याच झालेल्या दि मुस्लिम को-ऑपरेटीव्ह बँक अध्यक्षपदी डॉ.पी.ए.इनामदार यांचे चिरंजीव तन्वीर पी.ए.इनामदार व व्हा.चेअरमनपदी ॲड.अय्युब शेख यांची बिनविरोध निवड झालेबद्दल शनिवार दि. 4 ऑक्टोबर रोजी रात्रौ 7.30 वा. जगदंबा मंगल कार्यालय, जुना मोरगाव रोड, बारामती याठिकाणी बँकेचे संचालक तथा ॲडमिन चेअरमन आलताफ सय्यद व एकता ग्रुपतर्फे नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.\

महाराष्ट्र विधान परिषदेचे तालिका सभापती आ.इद्रिस नाईकवडी यांच्या शुभहस्ते अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे आलताफ सय्यद यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, मा.ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती शहराध्यक्ष जय पाटील, तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास आयएसएमटीचे अध्यक्ष किशोर भापकर, माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, केएसीएफचे सचिव प्रशांत सातव, बारामती बँकेचे व्यवस्थान मंडळाचे अध्यक्ष ॲड.गिरिष कुलकर्णी, ज्येष्ठ नागरी संघाचे खजिनदार फखरूशेठ बोहरी, मुंबईचे माजी सहा.पोलीस आयुक्त इसाक बागवान, राष्ट्रवादी युवक बारामती शहराध्यक्ष अविनाश बांदल, महिला बारामती शहराध्यक्षा सौ.अनिता गायकवाड, बा.न.प.शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरूद्दीन सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी जास्तीत जास्त सभासद, खातेदार, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!