पुणेः 27 जुलै रोजी महाराष्ट्र सरकारने विधवांसाठी 1 हजार 500 रूपये पेन्शन योजना लागू केली आहे त्याबाबत संपूर्ण माहिती टॉप फाऊंडेशनच्या माध्यमातून मिळणार असल्याचे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नजीर काझी यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
पुणे येथील टॉप फाऊंडेशन, ऑल इंडिया उलेमा माशाईख बोर्ड, शिव-सुफी लोकसेवा फाऊंडेशन, खिदमत-ए-आझाद ट्रस्ट आणि हेल्प द नीड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने 27 जुलै रोजी दु.3 ते सायं.6 वाजेपर्यंत सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, टिंबर मार्केट, भवानी पेठ पुणे याठिकाणी सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या 51 समाजसेवकांचा सत्कार आणि विविध समाजातील विधवा महिलांसाठी महाराष्ट्र राज्याचे जी पेन्शन योजनेबाबत माहिती देण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात जी विधवा घर संसार पाहुन, आपल्या संसाराला हातभार लागेल या हेतूने घरातून छोटा व्यवसाय करीत असेल त्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला मोठा व्यवसाय करण्यासाठी मदतीचा हात सुद्धा देण्यात येणार असल्याचे टॉप फाऊंडेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष शकील शेख यांनी सांगितले आहे.
शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी टॉप फाऊंडेशनने घेतलेला पुढाकार वाखण्याजोगा आहे. सदरचा उपक्रम राबविण्यासाठी टॉप फाऊंडेशनचे आधारस्तंभ व पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रशिदभाई शेख तसेच युवा नेते शानुर रशिद शेख यांचेही मोलाचे सहकार्य लाभते.
तरी जास्तीत जास्त विधवा महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन टॉप फाऊंडेशनचे फैसल रिश्तेवाला, अलीम शेख, सलीम अंसारी, रफिक तांबोळी व वसीम शेख यांनी केले आहे.
स्त्री-पुरूष ही संसार आणि समाज रथाची दोन चाके आहेत. परंतु, नैसर्गिक आणि मानवी वर्तनाच्या गुंतागुंतीमुळे अनेकदा यात असमतोल निर्माण होत असल्याचे आपण पाहतो. विधवा महिलांची संख्या पाहता लक्षणीय आहे या महिलांना कुटुंबात व बाहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या एकटीने पेलाव्या लागतात. यामुळे शासनाच्या योजनांबाबत त्या कशा मंजूर करून घ्याव्यात याबाबत त्यांना ज्ञात नसते. टॉप फाऊंडेशनने या उपक्रमातून महिला सबलीकरण, सक्षमीकरणाचे काम केले असल्याचे अलअजीम परफ्युमन्स्चे संचालक व युवा उद्योजक अजीमभाई शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.