कर्नाटक व महाराष्ट्र भाषिक वाद: बसस्थानकात कर्नाटकची महिलेची प्रसुतीकर्नाटकी महिलेसाठी माणुसकीच्या नात्याने नगरसेवकगणेश (भाईजी) सोनवणे, कैश शेख व गौतम शिंदे धावले… हीच बारामतीची विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ओळख

बारामती(प्रतिनिधी): कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद म्हणजे केवळ सीमारेषेचा प्रश्न नाही, तर तो भाषिक अस्मिता, सांस्कृतिक ओळख आणि लोकशाही हक्कांचा प्रश्न आहे. सीमा भागांमध्ये अजूनही मराठी शाळा, मराठी माध्यमांचे प्रशासकीय प्रश्न, बोर्डांचे वाद सुरूच आहेत. दोन्ही राज्यांतून अधूनमधून राजकीय वाद उफाळून येतात. येथील मराठी माणसावर होणारा अन्याय न पाहवणारा आहे.

एवढं असताना बारामतीत माणुसकीचे दर्शन घडले तेही राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून तेही बारामतीत यावेळी कोणाच्याही मनात भाषिक वाद न येता प्रथमतः मदतीचा हात पुढे करीत महिलेचे प्राण वाचविले.

दि.13 जुलै 2025 रोजी साडेबारा ते दीड वाजणेच्या सुमारास बारामती बसस्थानकात एक लहान मुल कडेवर घेऊन गरोदर महिला थकली-भागलेली आली. तिला मराठीतर दूर हिंदी सुद्धा येत नव्हती. ती कन्नड भाषीक होती तिचे बोलणे कोणाला समजेना बसस्थानकाचे पार्किंग चालक कैश शेख यांनी तिची अवस्था पाहुन रात्री येणाऱ्या कर्नाटक गाडीचे वाहक व चालकांना बोलावून या महिलेची विचारपूस करण्यास सांगितले. त्यानंतर कळाले की ती कर्नाटकमधील गुलबर्गा या गावातील आहे.

तिस पैसे जमवून सकाळच्या कर्नाटक गाडीत बसवूनच देणेचे होते. तत्पूर्वी तिला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. रात्रीची वेळ कोण महिला दिसत नव्हती, कोण पुढे येत नव्हते. 108 रूग्णवाहिकेला फोन केला असता, रूग्णवाहिका बाहेर होत्या. तेवढ्यात सदरची महिला प्रसुती झाली. तिची अवस्था पाहुन कैश शेख यांना घाम फुटला. येथील सुरक्षारक्षकांनी 112 नंबरवर फोन करून हकीकत सांगितली. सरकारी रूग्णालयात कोणताच संपर्क होत नसल्याचे पाहता कैश शेख यांनी माजी नगरसेवक गणेश उर्फ भाईजी सोनवणे यांना सदरचा प्रकार सांगितला. त्यांनी तातडीने सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालयातील यंत्रणा पाठविली. नगरसेवक सोनवणे यांनी गौतम शिंदे यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले त्यांनी सुद्धा मदतीसाठी प्रयत्न केला. एवढ्या रात्री त्या महिलेस उपचार मिळाला सध्या ती महिला रूई येथील महिला रूग्णालयात उपचार घेत आहे आणि तिचे बाळ सुखरूप आहे.

कर्नाटक महाराष्ट्र सिमेवर जरी भाषिक वाद सुरू असेल, मराठी माणसांना कर्नाटक नागरिक त्रास देत असतील तरी महाराष्ट्राच्या संस्कृतीला तडा न जाता तेही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या गावात बारामतीत सदर महिलेला सर्व सुख-सुविधा मिळाल्या हे खुप वाखण्याजोगे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एवढं तत्पर असतील तर नेते कसे असतील यावरून अंदाज बांधला पाहिजे. बारामती गणेश सोनवणे, कैश शेख आणि गौतम शिंदे, बसस्थानकाचे सुरक्षारक्ष, सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालयाचे डॉक्टर, नर्स व बारामती शहर पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!