भिगवण येथील, मोहरम व ताबूत मिरवणुकीत हिंदू मुस्लिम एक्याचे दर्शन

भिगवण(प्रतिनिधीः योगेश गायकवाड)ः जामा मस्जिद भिगवण येथे परंपरेनुसार मोहरम व ताबूत बसविला जातो, श्री काळभैरवनाथाच्या पांढरीतील मोहरम व ताबूतची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडत आलेली आहे. यावेळी मिरवणुकीत हिंदू मुस्लिम एक्याचे दर्शन पहावयास मिळते. यावेळी भिगवण पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन इब्राहिम मुलानी, रसूल मुलानी अब्दुल मुलांनी, नौशाद मुलानी, व समस्त मुलाणी परिवार करीत आलेले आहेत. कत्तलची रात्र 5 जुलै 2025 रोजी होती तर ताबुत विसर्जन विसर्जन दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 जुलै 2025 या रोजी भिगवण पुलावरती करण्यात आले.

यावेळी भिगवन ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच जावेद शेख, शाबुद्दीन शेख, असलम मुलांनी, जब्बार मुलानी, मौला मुलानी, सिराज मुलांनी, हमजू मुलांनी, मुन्ना मुलानी, तय्यब मुलानी, जमीर मुलानी, राजू मुलानी, सलीम मुलानी, मज्जिद मुलानी, सुलतान मुलानी, हुसेन मुलानी, सलीम शेख, अज्जू शेख इ. भिगवण येथील हिंदू मुस्लिम ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!