वडगाव निंबाळकर येथे संत सोपानकाका महाराज पालखीचे मुस्लिम समाजातर्फे उत्स्फूर्त स्वागत : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीकात्मक दर्शन

वडगाव निंबाळकर : संतश्रेष्ठ श्री सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत वडगाव निंबाळकर येथे मुस्लिम समाजाच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि आत्मीयतेने करण्यात आले. धार्मिक सलोखा, ऐक्य आणि सामाजिक समरसतेचा अनोखा संदेश देणारा हा उपक्रम वारकरी संप्रदायासाठी स्नेहभाव निर्माण करणारा ठरला.

माय माऊलींसह पालखी सोहळ्याचे आगमन होताच मुस्लिम समाजातर्फे पालखीचे व माय माऊलींचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व वारकऱ्यांना व मान्यवरांना अल्पोपहार देण्यात आला.

संत सोपानकाका महाराज पालखीचे विश्वस्त ॲड. त्रिगुण गोसावी यांचा देखील यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. त्यांना शाल व श्रीफळ देऊन मुस्लिम समाजाच्या वतीने गौरविण्यात आले. आपल्या भाषणात ॲड. त्रिगुण गोसावी यांनी सांगितले की, “मुस्लिम समाजाने जो सद्भावना आणि एकतेचा संदेश दिला आहे तो खरोखर अनुकरणीय आहे. असेच कार्य तुम्ही पुढेही करत राहा, माऊली नक्कीच आपल्या पाठीशी आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने वडगाव निंबाळकर येथील मुस्लिम समाजातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या वेळी असिफ शेख – अध्यक्ष, मुस्लिम समाज, जहांगीर शेख – उपाध्यक्ष, इकबाल शेख – सचिव, रिजवान पठाण –खजिनदार, शेख सर – स्पर्धा परीक्षा युवा मंच संस्थापक, टिपू भालदार, फिरोज भालदार, सलमान आत्तार, जावेद बागवान, इकबाल आत्तार, शहीद बागवान, फरदीन बागवान, इरफान बागवान, सोहेल भालदार, चांद बागवान, साद बागवान व अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीकात्मक दर्शन घडले असून वारकरी संप्रदाय आणि मुस्लिम समाज यांच्यातील बंध अधिक दृढ झाले आहेत. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने उभारलेला हा संवाद आणि सद्भावनेचा पूल समाजासाठी आदर्श ठरणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!