बारामती(वार्ताहर): एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ओढा खोलीकरण व रूंदीकरणामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहु लागले आहेत.
बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये ओढा खोलीकरण व रुंदीकरणाची यशस्वी कामे मागील 8 ते 10 वर्षांत मेघदुत प्रकल्पांतर्गत पूर्ण केली. सर्वप्रथम तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची निवड करून प्राधान्याने कामे पूर्णत्वास नेली. ज्याचा सकारात्मक परिणाम आज आपल्या सर्वांच्याच नजरेस पडत आहे.

सध्या सुरू असलेल्या पावसाने ग्रामिण भागातील जवळपास सर्वच ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. याच बरोबर बारामती शहरा लगतच्या वाढीव हद्दी मध्ये ही ओढा खोलीकरण व रूंदीकरण कामाची गरज आहे, पावसाचे वाहून जाणारे पाणी शिविरातच जिरवले जाऊन भुजल पाणी पातळीत वाढ व्हावी. याच मुख्य उद्देशाने फोरमच्या प्रमुख सौ.सुनेत्रावहिनी पवार यांच्याकडे विद्यमान स्थानिक नगरसेवक समीर चव्हाण यांनी पाठपुरावा करून प्रकल्प मेघदुत अंतर्गत तांदुळवाडी येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने ही मोहिम हाती घेतली होती. जी आज खर्या अर्थाने पुर्णत्वास आली व सकारात्मक परिणाम दिसुन येत आहेत.