भिगवण(प्रतिनिधी योगेश गायकवाड): घार कितीही उंच उडाली तरी तिचे चित्त पिलापशी असते तसे इंदापूर तालुक्याचे आमदार तथा राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत तक्रारवाडीसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत बौद्ध विहार व पेव्हर ब्लॉक साठी 20 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला.
या बौद्ध विहार व पेव्हर ब्लॉक बसविणेबाबतचा भूमिपूजन समारंभ ग्रामपंचायत तक्रारीवाडीचे सरपंच सौ.मनिषा वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच विजय जगताप. मा.सरपंच सतीश वाघ, अनिल काळंगे, माजी उपसरपंच प्रशांत वाघ, माजी जि.प.सदस्या सौ.राणी आढाव, सौ.तनुजा आढाव, सौ.संगीता आढाव, सौ.पूजा आढाव, माजी सरपंच अण्णासाहेब आढाव, डॉ.बाळासाहेब भोसले, भाऊसाहेब वाघ, महादेव सकुंडे, माजी सरपंच गणेश वायदंडे, युवा नेते सचिन आढाव, नवनाथ पाटोळे, सुरज जाधव, अक्षय जोगदंड, उमेश आढाव, युवा उद्योजक वैभव आढाव, श्याम शिंदे, हेमंत भोसले, राहुल भोसले, सौरभ खंडागळे, पत्रकार योगेश गायकवाड इ. सर्व तक्रारवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.