भिगवण(प्रतिनिधी योगेश गायकवाड): येथील ग्रामीण रूग्णालयात मोफत सोनोग्राफी सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी 22 लाभार्थ्यांनी या सोनोग्राफी सुविधेचा लाभ घेतला व समाधान व्यक्त केले.
उपसंचालक राधाकिशन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागनाथ यमपल्ले सर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सूर्या दिवेकर(स्त्रीरोग तज्ञ), डॉ अनिकेत लोखंडे, डॉ सचिन विभुते व इतर रुग्णालयीन स्टाफ यांच्या उपस्थितीत व लाभार्थी मनीषा लांडगे यांच्या हस्ते नवीन सोनोग्राफी मशीन चे उदघाटन करण्यात आले.
या सोनोग्राफीमुळे गरोदरपणातील मातांना प्रसुतीची तारीख, गर्भावस्थेचे वय, आठवड्यांची पुष्टी, गर्भाशयातील गर्भधारणा ग्रॅव्हिड गर्भाशय किंवा एक्टोपिक गर्भधारणा म्हणजे गर्भ गर्भाशयाच्या बाहेर रोपण होणे, गर्भाच्या हृदयाचे ठोके, गर्भाची वाढ, भ्रूणांची संख्या निश्चित, बाळाभोवती असलेली नाळ, रक्तप्रवाह, वार आणि अम्नीओटिक द्रवपदार्थ, गर्भात बाळाची स्थिती (ब्रीच प्रस्तुत), बाळाच्या शरीराची वाढ इ. अशा एकुण बाळाचं आरोग्य निश्चित केले जाते अशी माहिती होणार आहे.
भिगवण येथील सुरु झालेल्या मोफत सोनोग्राफी मुळे गरजू व गरीब जनतेला याचा फायदा होईल व घ्यावा अशी प्रशासनाच्या वतीने सांगितले. ग्रामीण रुग्णालय भिगवण सुरु झालेल्या मोफत सोनोग्राफीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.