भिगवण(प्रतिनिधी योगेश गायकवाड): येथील तक्रारवाडी संविधान चौक, जुनी मच्छी मार्केट समोर गतिरोध बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सवात महत्वाचे व तीन जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले गाव म्हणून भिगवण ओळखले जाते. पुनर्वसित भिगवण गाव दळणवळणाच्या दृष्टीने केंद्रबिंदू मानले जाते. महाराष्ट्रातील भिगवण पक्ष्यांसाठी स्वर्ग मानले जाते. या स्वर्गाकडे जाणारा रस्त्यात तक्रारवाडी गाव येते. वाढती वाहतुकीमुळे, रस्त्यांच्या कामामुळे पायी व दुचाकी हाकणाऱ्या चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.

काल परवाच एका क्रेटा चार चाकी वाहन रस्ता दुभाजक येथुन वळण घेत असताना बुलेट दुचाकी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने ते थेट क्रेटा वाहनाला धडकले. जर तक्रारवाडी संविधान चौक, जुनी मच्छी मार्केट समोर गतिरोधक असता तर सदरच्या दुचाकी वाहन चालकाला घेतलेली गती कमी करता आली असती, व चार चाकी वाहनाला रस्ता सहनरीत्या न भिता रस्ता ओलांडता आला असता.
तरी संबंधित ग्रामपंचायतीने व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जातीने लक्ष देऊन याठिकाणी गतिरोधक बसवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.