भिगवण(प्रतिनिधी योगेश गायकवाड): बहुजन प्रतिपालक, हिंदवी स्वराज्याचे संरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तक्रारवाडी येथील नवबौद्ध युवक संघटनेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.

तक्रारवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.मनिषा वाघ, सौ.सीमा काळंगे, भिगवण पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, मा.सरपंच सतिश वाघ, पोलीस पाटील अमर धुमाळ, डॉ.बाळासाहेब भोसले ग्रामस्थ तसेच सचिन आढाव मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीचे औचित्य साधून एलईडी लाईटमध्ये दर्शनी ठिकाणी लिहिलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.