इंदापूर(प्रतिनिधी अशोक घोडके): कर्मयोगी, संघर्षयोद्धा, लोकनेता व महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य करणारे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त व श्रीकांत फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लासुर्णे (ता.इंदापूर) येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन बारामती लोकसभेच्या संपर्क प्रमुख सौ.गीतांजली ढोणे, सौ.कांताबाई पांढरे व सौ.अनिता कटके यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. या शिबीरामध्ये नेत्ररोग तपासणी, नेत्रबिंदू शस्त्रक्रिया, ईसीजी, टुडे को ग्राफी तपासणी आणि औषध उपचार संपूर्णपणे मोफत करण्यात आले.
लासुर्णेचा आठवडे बाजार बुधवार असतो, बाजाराचा दिवस असल्यामुळे बाजार करण्यास आलेल्या नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. या शिबिरात 834 गरजू रुग्णांनी लाभ घेतला.
सदरचे शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवसेना इंदापूर तालुका उपसंघटक सौ.कमल लोंढे, इंदापूर तालुकाध्यक्ष रामचंद्र जामदार, इंदापूर शहराध्यक्ष शुभम जामदार, उपजिल्हा अध्यक्ष अण्णा काळे, तालुका समन्वय विजय पवार, तालुका उपाध्यक्ष विनायक गायकवाड, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा समन्वय सतीश गावडे, वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख विद्या राजे गायकवाड, वैद्यकीय मदत कक्षाचे बारामती व इंदापूरच्या आरोग्य सहाय्यक कल्पना जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.