इंदापूर(प्रतिनिधी अषोक घोडके): कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव यांनी समाजात केलेल्या उत्तम कामगिरी व सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले असलयाचे प्रतिपादन शिवसृृष्टी कला क्रीडा व शैक्षणिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय कळमकर पाटील यांनी केले.
हनुमंत जाधव यांना नुकताच शिवसृष्टी कला क्रीडा व शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी श्री.कळमकर पाटील बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार उपस्थित होते.
पुढे बोलताना कळमकर पाटील म्हणाले की, प्रत्येक यशामागे संघर्ष हा असतोच. संघर्षातून जन्माला आलेले यश हे नक्कीच प्रेरणादायी असते. जाधव यांची अशी राजकीय क्षेत्रातील कामगिरी व समाजसेवा ही अशीच अनमोल आहे. यामधून कित्येकांनी प्रेरणा घेऊन यशाच्या वाटचालीचा मार्ग धरलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करीत हनुमंत जाधव यांना कला क्रिडा व शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
हनुमंत जाधव यांनी कालठण नंबर एक या छोट्याशा गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले. ग्रामपंचायत निवडणूक पॅनल उभारून या पॅनलमध्ये लढवय्ये उमेदवार घेवून पॅनल बहुमताने निवडून आणला. एवढयावरच न थांबता त्यांनी महिलेला सरपंच पदाचे स्थान दिले. गावाचा आराखडा तयार केला, गावात लोक वर्गणीतून डोळयाचे पारणे फिटेल असे काळभैरवनाथाचे आदर्श मंदिराची उभारणी केली. या कामाचे कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या दौ-या दरम्यान केले. विशेष अजित पवार सध्या विरोधकाच्या भूमिकेत असताना सुध्दा मंदिरात भेट देऊन सरपंच व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. इतर गावांनीही त्यांचा आदर्ष घ्यावा असे गौरवोद्गार सुध्दा ना.पवार यांनी यावेळी काढले.
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी जातीपातीचे अथवा खोडसाळपणाचे राजकारण न करता कारखान्याच्या हितासाठी सर्वांनी आपला ऊस कर्मयोगी शंकराव पाटील सहकारी साखर कारखान्याला द्यावा असा प्रचार करून कारखान्यांना ऊभारी देण्याचे कार्य केले. अनेक गरजूंना मदत करून शेतकरी कुटुंबातील हनुमंत जाधव यांनी अनेक गोरगरीब व शाळकरी मुलांना सहकार्य केले.