’बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेला देवेंद्र फडणवीसांनी उचलून धरले : अजित पवार धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे हिंदूविरोधी असण्यासारखे आहे – देवेंद्र फडणवीस

वतन की लकीर (ऑनलाईन): उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा विधानसभा निवडणूकीच्या प्रचारदरम्यान व्यक्त केली त्या घोषणेला देवेंद्र फडणवीस यांनी उचलून धरून, अजित पवार धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे हिंदूविरोधी असण्यासारखे आहे असेही ते म्हणाले.

भाजपा नेत्यांनी व शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांनी देखील योगींचा हा नारा उचलून धरला आहे. तर, महायुतीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने मात्र स्पष्ट केले आहे ते या घोषणेशी सहमत नाहीत. त्यापाठोपाठ भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील अशा घोषणेची आवश्यकता नसल्याचे नमूद केले. दुसर्‍या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हैं तो सेफ हैंअसा नारा दिला. मात्र, या दोन घोषणांमुळे महायुतीत चांगलाच गोंधळ उडालेला दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या घोषणेला महामंत्र म्हटलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले की, अजित पवार व पंकजा मुंडेंना जनतेच्या भावना समजल्या नसतील. त्यांना काहीतरी वेगळं बोलायचे असेल आणि तुम्ही प्रसारमाध्यमांनी काहीतरी वेगळा अर्थ घेतला असेल किंवा त्यांना योगींच्या वक्तव्याचा अर्थ समजला नसेल. जनतेचा कल समजून घ्यायला अजित पवारांना वेळ लागेल असेही फडणवीस यांनी सांगितले.

पुढे फडणवीस म्हणाले, केवळ अजित पवारांबद्दल बोलायचे झाल्यास ते गेल्या अनेक दशकांपासून अशा विचारांच्या लोकांबरोबर राहिले आहेत जे स्वतःला सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) म्हणवून घेत आले आहेत. त्यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगत आले आहेत. परंतु, त्यांचे धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे हिंदूविरोधी असण्यासारखे आहे. हिंदुत्वाचा विरोध म्हणजेच धर्मनिरपेक्षता अशी विचारधारा असलेल्या लोकांबरोबर अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून राहिले आहेत. त्यामुळे जनतेचा मिजाज (कल), राष्ट्रवादी मिजाज समजून घेण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागेल.

राहिला प्रश्न बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा, तर, त्याचा अर्थ समाजाला एकत्र ठेवणे असा आहे. यात काहीही चुकीचे नाही. तसेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक है तो सेफ है या घोषणेला महामंत्र म्हटलं आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण समाजाला एकत्र ठेवण्यासाठी एक मंत्र दिला आहे. आपण एकत्र राहिलो तरच आपला विकास होईल, असा त्यामागचा अर्थ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!