श्री छत्रपती हायस्कूल विद्यालयास मदत : विक्रमभैय्या निंबाळकर व निलेश कुलकर्णी यांचे सर्वत्र कौतुक

बारामती: माणूस कितीही मोठा झाला तरी बालपणी बाळकडू घेतलेल्या शाळेला तो कधीच विसरत नसतो. माझ्या गावी माझी शाळा, मला तिचा अजून लळा या उक्तीप्रमाणे सणसर गावचे दानशूर व्यक्तीमत्व व सणसर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे मा.चेअरमन विक्रमभैय्या निंबाळकर व बारामतीचे प्रसिद्ध उद्योजक निलेश कुलकर्णी या दोघांनी सिल्व्हर ओक ग्रुप मित्र मंडळाच्या प्रेरणेतून श्री छत्रपती हायस्कूल सणसर या विद्यालयास भरघोस अशी मदत केली आहे.

समाजात अनेक ठिकाणी माजी विद्यार्थी लहानपणी आपण शिकलेल्या शाळेला मोठी मदत देत असतात हे आपण पाहिले असेल याचीच कास धरत विक्रमभैय्यांनी शाळेला जवळपास दीड लाखाहून अधिक रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे. असेही म्हणता येईल घार कितीही उंच आकाशात गेली तरी तिचे चित्त तिच्या पिलापशी असते त्याप्रमाणे विक्रमभैय्या सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रात उंच शिखर गाठत असले तरी ज्या शाळेने त्यांना घडविले त्यावर ते लक्ष देत असतात.

श्री छत्रपती हायस्कूल विद्यालयात एकूण आठ खोल्यांना आतून बाहेरून रंगकाम करण्याचे मोलाचे काम या दोघांनी केले. नुसते आश्र्वासन नव्हे तर प्रत्येक्षात काम सुद्धा सुरू केले आहे. सढळ हाताने केलेली मदतीचा आगाऊ रक्कम 25 ऑक्टोबर रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सर्जे सर यांचे हस्ते रंगकाम ठेकेदार अमोल भोईटे यांना सुपूर्द केली.

याप्रसंगी सणसर गावचे सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे, जाचकवस्ती ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष महेश निंबाळकर, माजी सरपंच राहुल काळे, सामाजिक कार्यकर्ते रोहित पार्लेकर तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विद्यालयाच्या वतीने या दोघांचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. यापुढे विद्यालयास काही मदत लागल्यास हक्काने हाक मारा असेही विक्रमभैय्या यांनी यावेळी सांगितले. विक्रमभैय्यांनी यापुर्वी एक वर्ग खोलीचे रंगकाम व डिजीटलकरण करून दिली होती. त्यामुळे विक्रमभैय्यांचे सतत विद्यालयावर विकासात्मक नजर असते. त्यामुळे विद्यालयाचे वतीने सदैव आम्ही त्यांचे आभारी आहोत असे मुख्याध्यापक सर्जे सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!