बारामती: येथील कृषि विज्ञान केंद्र व इ.के.एल.सी.एस.आर. फाउंडेशन बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमानाने दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व ऊस व्यवस्थापन हे तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सदरचे प्रशिक्षण 14 ऑक्टोबर 2024 रोजी प्रारंभ करण्यात आला होता. यावेळी विशेषज्ञ पशु संवर्धन, कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे डॉ.रतन जाधव यांनी मुक्त संचार गोठा, चारा व्यवस्थापन, पशुचे रोग आणि आजार व उपाय, मूरघास तंत्रज्ञान, वासरंचे संगोपन या विषयावर मार्गदर्शक करण्यात आले.
कृषी महाविद्यालयाचे डॉ.खंदारे यांनी कुक्कुटपालन व शेळीपालन याबद्दल मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे चंद्रकांत दाते यांनी गोड्या पाण्यातील मत्स्य पालन या विषयावर मार्गदर्शक केले.
तसेच प्रक्षेत्र भेटीसाठी जळगांव क.प.(ता.बारामती) येथील सुनील जगताप यांच्या गोठ्याला भेट देण्यात आली. यावेळी श्री.जगताप यांनी मुक्त संचार गोठा व मुरघासाबाबत माहिती दिली.
कृषी विज्ञान केंद्र, बारामतीच्या पशु संवर्धन विभाग अंतर्गत पशुपालकांना मोफत मुरघास बनवण्यासाठी दोन बॅग व सायलेज कल्चर चे वाटप करण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.धिरज शिंदे व विशेषज्ञ पशु संवर्धन, कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे डॉ.रतन जाधव यांचा निरोप समारंभ करण्यात आला. यावेळी कृषी विज्ञान केंद्रा मार्फत आयोजीत करण्यात येणार्या कृषिक 2025 या प्रदर्शना बद्दल माहिती दिली. तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षणाचे नियोजन किरण मदने यांनी केले. सदर प्रशिक्षणासाठी जि.बेंगलोर, कर्नाटक येथील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.