दिल्ली:कोरोनाचा प्रतिबंध करणारी यशस्वी लस येण्याआधी जगभरात 20 लाख मृत्यू होऊ शकतात अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
सद्यस्थितीला जगभरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 3 कोटी 20 लाखांपेक्षा जास्त आहे. अशात 20 लाख मृत्यू जगभरात होऊ शकतात अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. माईक रेयान णछ एजन्सीच्या इमर्जन्सी प्रोग्रामचे प्रमुख यांनीही ही भीती वर्तवली आहे. कोरोनाने मागील 9 महिन्यांमध्ये 9.93 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. ही लस येण्यापूर्वी संख्या दुपटीत जावू शकते असेही रेयान त्यांनी सांगितले आहे.
कोरोनाची बाधा झालेले अमेरिकेत लाखांपेक्षा जास्त लोक आहेत. भारताची संख्या लाखोच्या घरात जावून ठेपली आहे. भारत, ब्राझिल व रशियात हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तरुण पिढीला दोष देऊ नका, लॉकडाऊन सुटल्यानंतर नागरीकांनी भेटी-गाठी घेण्यास सुरुवात केली त्यामुळेही संक्रमण वाढले असल्याचे रेयान यांनी म्हटलं आहे.