बारामती(वार्ताहर): अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाने सी.सी.टी.व्ही. बसविल्याने चकीच्या गोष्टीला आळा बसेल व मंडळाने प्रशासनावरील ताण कमी करण्याचे काम केले असल्याचे अति.पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी प्रतिपादन केले.
अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाने परिसरात 5 मेगा पिक्सल 6 मी.मी.ची लेन्स असणारे सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविले. या कॅमेरेचे उद्घाटनाप्रसंगी श्री.मोहिते बोलत होते. यावेळी बारामती शहर पोलीस स्टेशनेचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले उपस्थित होते.

पुढे मोहिते म्हणाले की, बारामतीतील सर्व मंडळांनी तांदुळवाडी वेस तरूण मंडळाप्रमाणे उपक्रम हाती घेतल्यास प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होईल. चुकीच्या गोष्टींना आळा बसेल व गुन्हेगार शोधण्यास मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. सामाजिक क्षेत्रात मंडळाचे काम उत्कृष्ठ असल्याचे औदुंबर पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मोहन भटीयानी, अविनाश भापकर, स्वप्नील शेळके, निलेश गायकवाड, प्रकाश पळसे, जयसिंग पवार, स्वप्नील भागवत, राहुल जाधव, भाऊ सावंत, सौरभ राठोड, लल्लू ढवळे, प्रशांत हेंद्रे, सोनू बामने, प्रकाश फडतरे, ऍड.अमर लोहोकरे, संजय ढोरगे, हनुमंत इंगळे तसेच सौ.अनिता गायकवाड, सौ.वंदना भंडारे, सौ.मंगल कुर्ले, सौ.मीना गोरे आदी महिला वर्ग उपस्थित होता.