इंदापूर अर्बन बँकेचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल बँक असोसिएशनतर्फे गौरव : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिनंदन!

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): येथील इंदापूर अर्बन को-ऑप बँक लि. बँकेचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या गुणगौरव करण्यात आला. राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या इंदापूर अर्बन बँकेच्या या गौरवाबद्दल बँकेचे सभासद, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक यांचे अभिनंदन केले.

नुकताच पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. इंदापूर अर्बन बँकेने सन 2022-23 व 2023-24 या दोन्हीं आर्थिक वर्षात शून्य टक्के एनपीएमुळे 2 स्मृतीचिन्हे व प्रशस्तीपत्रे देऊन गौरव करण्यात आला.

इंदापूर तालुक्यातील युवकांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी कर्ज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कर्मयोगी शंकररावजी पाटील, राजेंद्रकुमार घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन पाटील यांनी बँकेची स्थापना केली.

सदर गौरव समारंभ प्रसंगी राज्याचे सहकार आयुक्त दिपक तावरे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, महाराष्ट्र राज्य सह बँक लि. मुंबई चे प्रशासक विद्याधर अनास्कर, पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

सदरचा पुरस्कार बँकेचे चेअरमन देवराज जाधव, व्हा.चेअरमन सत्यशील पाटील, संचालक लालासाहेब सपकाळ, तानाजी निंबाळकर, विजय पांढरे, मच्छिंद्र शेटे पाटील, सुभाष बोंगाणे, स्वप्निल सावंत, संजय जगताप, अविनाश कोतमिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय तावरे, वसुली अधिकारी जोतीराम जामदार यांनी स्वीकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!