ह.मोहम्मद पैगंबर(स.) यांच्या जयंतीनिमित्त भरतशेठ शहा यांच्या हस्ते खाऊचे वाटत

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): हजरत मोहम्मद पैगंबर(स.) यांच्या जयंती ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने इंदापूर शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणूकीत सहभागी झालेल्या तमाम मुस्लीम बांधवांना अंजुमन-ए-रजा, मुस्तफा सोशल क्लब, व्यंकटेशनगर इंदापूर यांच्या वतीने फळे, बिस्कीट, आईस्क्रीम, नानकटाई, बिसलरी असे विविध खाऊ वाटप भरतशेठ शहा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी आझाद सय्यद, समद सय्यद, विनोद शिंदे, अल्ताफ मोमीन, साजन ढावरे, अकबर आतार, रहीम मुंडे, हैयुल बागवान इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!